Monday, November 25, 2024
Homeक्रीडाAsian Games 2023 : भारतीय घोडेस्वारांची ऐतिहासिक कामगिरी; तब्बल ४१ वर्षांनतर जिंकले...

Asian Games 2023 : भारतीय घोडेस्वारांची ऐतिहासिक कामगिरी; तब्बल ४१ वर्षांनतर जिंकले सुवर्णपदक

नवी दिल्ली | New Delhi

१९ आशियाई क्रीडा स्पर्धेत (19 Asian Games) भारताला तिसरे सुवर्णपदक (Gold Medal) मिळाले असून भारताने घोडेस्वारी प्रकारात तब्बल ४१ वर्षानंतर पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. घोडेस्वारीमधील टीम ड्रेसेज प्रकारात भारतीय संघाने (Indian Team) हे सुवर्णपदक जिंकले असून यात सुदीप्ती हजेला, दिव्यकृती सिंह, अंशु अग्रवाल आणि हृदय छेडा यांचा समावेश आहे…

- Advertisement -

Onion Issue News : मुबंईतील बैठकीत कांद्याच्या प्रश्नावर तोडगा नाहीच! वाचा नेमकं आज काय झालं?

भारताचे घोडेस्वार सुदीप्ती, दिव्यकृती, अंशू आणि हृदय यांनी अंतिम फेरीत (Final Round) चमकदार कामगिरी करत भारताच्या संघाला अंतिम सामन्यात २०९.२०५ गुण मिळवून दिले. तर दिव्यकृतीला ६८.१७६ गुण, हृदयला ६९.९४१ गुण आणि अंशूला ७१.०८८ गुण मिळाले. भारतीय संघ चीनपेक्षा ४.५ गुणांनी पुढे होता.

Nashik Rain News : नाशकात पावसाची ‘जोर’ धार; नागरिकांची तारांबळ

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारताची नौकानयपटू (Sailor) नेहा ठाकूरने महिलांच्या नौकानयन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. आजच्या दिवसातील भारताचे हे पहिले पदक होते. त्यानंतर आता घोडेस्वारीमधील टीम ड्रेसेज प्रकारात भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने आतापर्यंत एकूण १३ पदके जिंकली असून दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने २ सुवर्णांसह ११ पदके जिंकली होती. यानंतर आता तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून अनेक पदकांची अपेक्षा आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Ajit Pawar : “…म्हणून अजित पवार शरद पवारांपासून दूर गेले”; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या