Monday, November 25, 2024
Homeक्रीडाAsian Games 2023 : भारतीय खेळाडूंची पदकांची लयलुट सुरुच; नेमबाजीत आणखी एक...

Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंची पदकांची लयलुट सुरुच; नेमबाजीत आणखी एक सुवर्णपदक

नवी दिल्ली | New Delhi

चीनमधील (China) हांगझोऊ येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (19th Asian Games) भारतीय खेळाडूंची पदकांची लयलुट सुरूच असल्याचे दिसत आहे. आज रविवार (दि.०१ ऑक्टोबर) रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी (Indian players) चमकदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदकासोबत रौप्य पदक देखील मिळवून दिले आहे. त्यामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या ४१ वर पोहचली आहे…

- Advertisement -

Accident News : पर्यटकांची बस १०० फूट खोल दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

भारतीय नेमबाज के. चेनाई, पृथ्वीराज तोंडाईमन आणि जोरावर सिंग या त्रिकुटाने चमकदार कामगिरी करत भारताला आजच्या दिवसातील पहिले सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून दिले. तर महिला संघातील राजेश्वरी कुमारी, मनीषा कीर आणि प्रीती रजक यांनी टीम ट्रॅप शूटिंगमध्ये रौप्य पदकावर (Silver Medal) नाव कोरले. त्याचबरोबर आदिती अशोकने गोल्फमध्ये रौप्यपदक पटकावले. तसेच आदिती अशोकने शेवटच्या दिवशी अगदी सामान्य कामगिरी केली. सात स्ट्रोकची आघाडी घेतल्यानंतर सामन्याच्या शेवटी ती दोन स्ट्रोकने मागे पडली आणि सुवर्णपदक हुकले.

Aaditya Thackeray : “यह डर अच्छा है” असे म्हणत आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंसह सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नेमबाजीमधून (Shooting) सर्वाधिक पदके मिळाली आहेत. नेमबाजीच्या विविध प्रकारांमधून भारताला आतापर्यंत २१ पदके मिळाली आहेत. यामध्ये सात गोल्ड, सहा रौप्य आणि आठ कांस्य पदकांचा समावेश आह. तर घोडेस्वारी, स्क्वॅश, महिला क्रिेट आणि टेनिस मिश्र या प्रकारात भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच भारताच्या खात्यात आतापर्यंत ४१ पदके जमा झाली असून यामध्ये ११ सुवर्ण, १६ रौप्य आणि १४ कांस्य पदकांचा (Bronze Medals) समावेश आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Lok Sabha Election : मिशन ४५ साठी भाजपचा मेगाप्लॅन; ‘या’ विद्यमान आमदारांना उतरवणार रिंगणात

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या