Friday, November 22, 2024
Homeजळगावलोकसभा निवडणुकीत इच्छुकांची विधानसभेसाठी फिल्डींग!

लोकसभा निवडणुकीत इच्छुकांची विधानसभेसाठी फिल्डींग!

अमळनेर | बाबुलाल पाटील
अमळनेर तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना किती मते पडतात त्यावर विधानसभेचे गणिते ठरणार असून ही विधानसभेपुर्वी सेमिफायनलच आहे.


लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार स्मीता उदय वाघ ह्या अमळनेर तालुक्यातीलच असून महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार हे पारोळा तालुक्यातील आहेत. दोघे उमेदवारांनी जि.प. गटनिहाय प्रचाराला सुरूवात केलेली आहे. मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी प्रचारात झोकून दिलेले आहे. शिरीष चौधरी गटाचे काही कार्यकर्ते हे करण पवारांचे मित्र असल्याने ते करण पवारांचा उघड उघड प्रचार करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत कुणाला किती मते पडतात यावर विधानसभेचे गणित अवलंबून राहणार आहे.

- Advertisement -


लोकसभेच्या निवडणुकीत माजी आमदार साहेबराव पाटील अलिप्त असून ते वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर माजी आमदार साहेबराव पाटील आपली भूमिका ठरवतील असा अंदाज आहे. यावेळी अमळनेर विधानसभेसाठी अजित पवार गटाकडून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील उमेदवार राहतील. माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांनी ह्या वर्षी त्यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा केला. ते भाजपात असल्याने ही जागा महायुतीत अजित पवार गटाकडे जाईल. त्यामुळे ते अपक्ष उभे राहतील किंवा अन्य पक्षाचा पर्याय शोधतील. कॉंग्रेसचे अनिल शिंदे हे पण इच्छुक असून त्यांनीसुद्धा तालुकाभर संपर्क ठेवलेला आहे.


गुजरात ए.टी.एस. मधून निवृत्त झालेले आणि झाडी गावाचे मूळ रहीवाशी प्रकाशभाई पाटील यांनीही विधान सभेसाठी तयारी सुरू केली आहे. उबाठा गटात नुकताच प्रवेश केलेल्या ऍड.ललिता पाटील पण इच्छुक आहेत. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील हे लोकसभेच्या निकालानंतरच आपली भूमिका जाहीर करतील सध्या ते वेट अँण्ड वॉच या भूमिकेत आहेत.
त्यामुळे लोकसभेची निवडणूक विधान सभे पूर्वीची सेमीङ्गायनल असून सर्व जण आप आपल्या पद्धतीने अंदाज बांधत आहेत.

त्यामुळे लोकसभेची निवडणूक विधान सभे पूर्वीची सेमीफायनल असून सर्व जण आप आपल्या पद्धतीने अंदाज बांधत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या