Monday, May 5, 2025
Homeक्राईमपक्षकाराचा वकिलावर शस्त्राने हल्ला

पक्षकाराचा वकिलावर शस्त्राने हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मध्य शहरातील जुन्या न्यायालयाच्या आवारात एका पक्षकाराने वकिलावर हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. अ‍ॅड. अशोक सखाराम कोल्हे (वय 54) असे जखमी वकिलाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वकील संघटनेने या घटनेचा निषेध केला असून, गुरूवारी याबाबत बार असोसिएशनची बैठक होणार असल्याचे अ‍ॅड. शिवाजी कराळे यांनी सांगितले.

- Advertisement -

अनिल गायकवाड (रा. नगर) असे हल्ला करणार्‍या संशयित पक्षकाराचे नाव आहे. कोतवाली पोलिसांच्या पथकाने त्याला रात्री ताब्यात घेतले. बुधवारी दुपारच्या सुमारास काही वकील जुन्या न्यायालयाच्या आवारात असताना ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अ‍ॅड. कोल्हे यांच्या तोंडावर गायकवाड नावाच्या पक्षकाराने चाकूने वार केल्याचे समोर आले. वकिलांनी व परिसरातील स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले. कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व पथकाने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले आहे. संशयित गायकवाड याला ताब्यात घेतल्याचे निरीक्षक दराडे यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Unseasonal Rain : जिल्ह्यातील ‘या’ भागात गारांसह अवकाळी पावसाची हजेरी;...

0
नाशिक | Nashik राज्यातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा तडाखा बसत असून, अवकाळीचे ढगही घोंघावत आहेत. आज (सोमवारी) जिल्ह्यातील मनमाड आणि पानेवाडी (Manmad and Panewadi Area) परिसरात...