नाशिक | Nashik
आज (बुधवार) सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी राज्यात नऊ वाजेपर्यत ६.६१ टक्के आणि दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.तर नाशिक जिल्ह्यात सकाळी नऊला ६.९३, अकरा वाजता १८.८२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात ३२.३५ टक्के मतदान झाले आहे.
यात सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात ४३.२९ तर सर्वात कमी २७.३४ टक्के बागलाण मतदारसंघात झाले आहे. तर नांदगाव मतदारसंघात ३०.१६ टक्के, मालेगाव मध्य ३५.८२ टक्के, मालेगाव बाह्यमध्ये २७.७६ टक्के, कळवण ३६.१५ टक्के, चांदवड ३४.१९ टक्के, येवला ३५.८६ टक्के, सिन्नर ३६.४० टक्के, निफाड ३१.८० टक्के, नाशिक पूर्व २८.२१ टक्के, नाशिक मध्य ३०.२७ टक्के, नाशिक पश्चिम २८.३४ टक्के, देवळाली २८.१९ टक्के,इगतपुरी ३४.९८ टक्के इतके मतदान झाले असून जिल्ह्यात एकूण ३२.३५ टक्के मतदान दुपरी ०१ वाजेपर्यंत झाले आहे.
सकाळी ११ वाजेपर्यंत १८.८२ टक्के मतदान
नांदगाव मतदारसंघात १६.४६, मालेगाव मध्य मतदारसंघात २२.७६ , मालेगाव बाह्यमध्ये १७.३७, बागलाण १८.२३, कळवण १८.२४, चांदवड २१.३०, येवला २०.९२, सिन्नर २१.१०, निफाड १७.६४, दिंडोरी २६.४१, नाशिक पूर्व १३.९०, नाशिक मध्य १८.४२, नाशिक पश्चिम १६.३२, देवळाली १५.०१ आणि इगतपुरीत २०.४३ असे एकूण १८.८२ टक्के मतदान नाशिक जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत झाले होते.
सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६.९३ टक्के मतदान
नांदगाव मतदारसंघात ४.९२, मालेगाव मध्य मतदारसंघात ९.९८, मालेगाव बाह्यमध्ये ६.३०, बागलाण ६.११, कळवण ८.९१, चांदवड ६.४९, येवला ६.५८, सिन्नर ८.०९, निफाड ५.४०, दिंडोरी ९.७१, नाशिक पूर्व ६.४३, नाशिक मध्य ७.५५, नाशिक पश्चिम ६.२५, देवळाली ४.४२ आणि इगतपुरीत ६.८८ असे एकूण ६.९३ टक्के मतदान नाशिक जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत झाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा