Wednesday, November 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Assembly Election 2024 : जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६० टक्के मतदान

Nashik Assembly Election 2024 : जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६० टक्के मतदान

तर राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८. २२ टक्के मतदान

नाशिक | Nashik

गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) मतदानाची (Voting) प्रक्रिया आज (बुधवार) सुरळीत पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून सुरु झालेले मतदान सायंकाळी ५ वाजेपर्यंत उत्साहात सुरु असताना पाहायला मिळाले. शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह संचारल्याचे दिसून आले. सकाळपासून सुरु असलेल्या मतदानाच्या टक्केवारीत दर दोन तासांनी वाढ होतांना पाहायला मिळाली. तर मतदान केंद्रांवर मतदानासाठी पुरुष व महिलांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या.

- Advertisement -

सकाळी सकाळी नऊ वाजता ६.९३ टक्के,११ वाजता १८.८२ टक्के तर दुपारी एक वाजेपर्यंत ३२.३५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत ही आकडेवारी वाढून ४६.१८ टक्क्यांवर पोहोचली होती. यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही आकडेवारी ६०.११ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील नाशिक पूर्व मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वात कमी म्हणजे ४९.०६ टक्के तर सर्वात जास्त मतदान ७१.९७ टक्के मतदान दिंडोरी मतदारसंघात झाल्याचे दिसून आले.

तर नांदगाव मतदारसंघात ५९.९३ टक्के, मालेगाव मध्य ६१.५८ टक्के, मालेगाव बाह्यमध्ये ५७.५६ टक्के, बागलाण ५३.८४ टक्के, कळवण ७०.३५ टक्के, चांदवड ६५.०१ टक्के, येवला ६८.६९ टक्के, सिन्नर ६३.८५ टक्के, निफाड ६३.२५ टक्के,नाशिक मध्य ५१.४९ टक्के, नाशिक पश्चिम ५०.३९ टक्के, देवळाली ५५.०८ टक्के, इगतपुरी ६९.३९ टक्के इतके मतदान झाले असून जिल्ह्यात एकूण ६०.११ टक्के मतदान सायंकाळी ०५ वाजेपर्यंत झाले आहे.

दुपारी तीन वाजेपर्यंत ४६.१८ टक्के मतदान

दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान ३८.९४ टक्के नाशिक पूर्व मतदारसंघात झाले होते. तर सर्वाधिक मतदान दिंडोरीत ५९.३३ टक्के झाले होते. तर नांदगाव मतदारसंघात ४२.९६ टक्के, मालेगाव मध्य ४०. टक्के, मालेगाव बाह्यमध्ये ४२.००टक्के, बागलाण ३९.०४ टक्के, कळवण ५६.०३ टक्के, चांदवड ५१.०६ टक्के, येवला ५२.७२ टक्के, सिन्नर ५२.०० टक्के, निफाड ४७.९६ टक्के,नाशिक मध्य ४२.५६ टक्के, नाशिक पश्चिम ४०.५१ टक्के, देवळाली ४१.०२ टक्के,इगतपुरी ५२.६४ टक्के इतके मतदान झाले असून जिल्ह्यात एकूण ४६.१८ टक्के मतदान दुपारी ०३ वाजेपर्यंत झाले आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत झाले होते ३२.३५ टक्के मतदान

दिंडोरी मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ४३.२९ तर सर्वात कमी २७.३४ टक्के बागलाण मतदारसंघात झाले होते. तर नांदगाव मतदारसंघात ३०.१६ टक्के, मालेगाव मध्य ३५.८२ टक्के, मालेगाव बाह्यमध्ये २७.७६ टक्के, कळवण ३६.१५ टक्के, चांदवड ३४.१९ टक्के, येवला ३५.८६ टक्के, सिन्नर ३६.४० टक्के, निफाड ३१.८० टक्के, नाशिक पूर्व २८.२१ टक्के, नाशिक मध्य ३०.२७ टक्के, नाशिक पश्चिम २८.३४ टक्के, देवळाली २८.१९ टक्के,इगतपुरी ३४.९८ टक्के इतके मतदान झाले असून जिल्ह्यात एकूण ३२.३५ टक्के मतदान दुपरी ०१ वाजेपर्यंत झाले आहे.

सकाळी ११ वाजेपर्यंत १८.८२ टक्के मतदान

नांदगाव मतदारसंघात १६.४६, मालेगाव मध्य मतदारसंघात २२.७६ , मालेगाव बाह्यमध्ये १७.३७, बागलाण १८.२३, कळवण १८.२४, चांदवड २१.३०, येवला २०.९२, सिन्नर २१.१०, निफाड १७.६४, दिंडोरी २६.४१, नाशिक पूर्व १३.९०, नाशिक मध्य १८.४२, नाशिक पश्चिम १६.३२, देवळाली १५.०१ आणि इगतपुरीत २०.४३ असे एकूण १८.८२ टक्के मतदान नाशिक जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत झाले होते.

सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६.९३ टक्के मतदान

नांदगाव मतदारसंघात ४.९२, मालेगाव मध्य मतदारसंघात ९.९८, मालेगाव बाह्यमध्ये ६.३०, बागलाण ६.११, कळवण ८.९१, चांदवड ६.४९, येवला ६.५८, सिन्नर ८.०९, निफाड ५.४०, दिंडोरी ९.७१, नाशिक पूर्व ६.४३, नाशिक मध्य ७.५५, नाशिक पश्चिम ६.२५, देवळाली ४.४२ आणि इगतपुरीत ६.८८ असे एकूण ६.९३ टक्के मतदान नाशिक जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत झाले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या