Saturday, November 23, 2024
HomeराजकीयMaharashtra Politics : भाजप विधानसभेच्या तब्बल १७० जागा लढवणार?

Maharashtra Politics : भाजप विधानसभेच्या तब्बल १७० जागा लढवणार?

शिवसेना-राष्ट्रवादीला किती जागा मिळणार

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) राज्यात कमी जागा मिळाल्यानंतर भाजपने (BJP) आत्मचिंतन करून लगेचच विधानसभेची तयारी सुरु केली आहे. यावर्षी हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर या राज्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांसह भाजपने देखील विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Pune Accident : पुणे जिल्ह्यात पुन्हा ‘हिट अँड रन’! आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले

काल भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत (Mumbai) बैठक पार पडली.या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १७० ते १८० जागा लढवाव्यात, अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये विधानसभा लढविण्यासाठी किती जागा मिळणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हे देखील वाचा : Nashik Bribe News : प्रभारी सहाय्यक आयुक्त जाळ्यात

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १६४ जागा लढविल्या होत्या.यातील १०५ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, तरीही भाजपला मुख्यमंत्रीपदापासून दूर राहावे लागले. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळावे अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे आपण १७० ते १८० जागांवर उमेदवार उभे करायला हवे, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचे बोलले जात आहे. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीत आहे. त्यामुळे भाजपला विधानसभेच्या जागा लढविताना काहीशी तडजोड करावी लागणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत ( Assembly Elections) २८८ पैकी तब्बल १७० जागा लढवण्याची भाजपची भूमिका आहे. मात्र,अद्याप यावर कुठल्याही नेत्यांनी उघडपणे भाष्य केलेले नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत १५ पैकी ७ जागा जिंकणाऱ्या शिंदे शिवसेने महायुतीत आपणच मोठा भाऊ असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील विधानसभा निवडणुकीत ९५ ते १०० जागांवर उमेदवार देण्यास आग्रही आहे. अशातच आता भाजपने १७० जागा लढवण्याची भूमिका घेतल्यास महायुतीमधील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या