Monday, November 25, 2024
HomeनगरCongress Candidate List : श्रीरामपूरमधून लहू कानडेंचा पत्ता कट, काँग्रेसकडून हेमंत ओगलेंना...

Congress Candidate List : श्रीरामपूरमधून लहू कानडेंचा पत्ता कट, काँग्रेसकडून हेमंत ओगलेंना उमेदवारी

श्रीरामपूर । Shrirampur

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२६ ऑक्टोबर) काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या दुसऱ्या यादीमध्ये २३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

काँग्रेसने दुसऱ्या यादी जाहीर करताना विद्यमान आमदार लहू कानडे यांना वगळून हेमंत ओगले यांना संधी दिली आहे. आमदार लहू कानडे आणि हेमंत ओगले यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच होती. दोघांनी मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यापूर्वी यात्रा काढल्या होत्या. हेमंत ओगले यांना करण ससाणे यांचे मोठे समर्थन मिळाले. हेमंत ओगले आमदार कानडेंविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते.

दरम्यान काँग्रेसचे पक्ष निरीक्षक शिर्डीत आल्यावर तिथं आमदार कानडे आणि ओगले समर्थक यांच्यात वाद झाला होता. हेमंत ओगले यांनी आमदार कानडे यांच्यावर पक्ष निरीक्षकांसमोर गंभीर आरोप केले होते. यानंतर दोघांमध्ये चांगलेच वातावरण तापले. उमेदवारी मिळवण्यासाठी हेमंत ओगले यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्याचवेळी आमदार कानडे यांनी देखील ताकद लावली होती. परंतु आमदार कानडे कमी पडले आणि हेमंत ओगले यांनी संधी साधली.

काँग्रेसने जाहीर केली 23 उमेदवारांची यादी

1- भुसावळ– राजेश मानवतकर

2- जळगाव जामोद-डॉ. श्रीमती स्वाती वाकेकर

3- अकोट– महेश गंगाने

4- वर्धा– शेखर शेंडे

5- सावनेर– श्रीमती अनुजा केदार

6- नागपूर दक्षिण – गिरीश पांडव

7- कामठी – सुरेश भोईर

8- भंडारा– श्रीमती पूजा ठावकर

9- अंजनी मोरगाव– दिलीप बनसोड

10- आमगाव– राजकुमार पुरम

11- राळेगाव– प्रो. वसंत पुरके

12- यवतमाळ– अनिल बाळासाहेब शंकरराव मांगुळकर

13- आर्णी– जितेंद्र शिवाजीराव मोघे

14- उमरखेड– साहेबराव दत्तराव कांबळे

15- जालना– कैलास गोरंट्याल

16- औरंगाबाद ईस्ट– मधुकर देशमुख

17- वसई– विजय गोविंद पाटील

18- कांदिवली पूर्व –काळू बढेलिया

19- चारकोप– यशवंत जयप्रकाश सिंग

20- सायन कोळीवाडा – गणेश कुमार यादव

21- श्रीरामपूर – हेमंत ओगले

22- निलंगा– अभय कुमार सतीश राव साळुंखे

23- शिरोळ– गणपतराव आप्पासाहेब पाटील

पक्षाने केलेल्या अन्यायाविरुद्ध जनताच न्याय करेल – आ. कानडे

काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अत्यंत प्रामाणिकपणे पक्ष नेतृत्वाशी व पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहिलो. मायबाप मतदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची दिलेली संधी जबाबदारी समजून भेदभाव न करता सर्वांची कामे केली. कोरोनासारख्या महामारीमध्ये दोन वर्ष वायाला जाऊनही आमदारकीच्या कार्यकाळात मागील २० वर्षात झाली नाही एवढी विकास कामे केली. याचा जमाखर्चही मायबाप जनतेसमोर लेखी स्वरूपात कार्य अहवाल प्रसिद्ध करून सादर केला. घराणेशाहीच्या ताब्यातून पक्ष संघटना मुक्त करून तळागाळापर्यंत उत्तम संघटना बांधली. जनतेमध्ये आमदार लहू कानडे यांनाच पुन्हा संधी देण्याची भावना असताना पक्षाच्या दिल्लीस्थित नेत्यांनी एका पक्षनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्याचा विश्वासघात केला. ही अत्यंत वेदना देणारी बाब आहे. महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आचार्य अत्रेनंतर जनतेमधून निवडून गेलेला मी एकमेव सदस्य ठरलो. विधानमंडळात मागील २० वर्ष बंद पडलेला श्रीरामपूरचा आवाज जनतेचे प्रश्न मांडून पुन्हा बुलंद केला. त्यामुळे पुन्हा मायबाप मतदारांच्या न्यायालयात माझ्यावर पक्षाने केलेल्या अन्यायाच्या विरोधात सोमवार दि. 28 रोजी उमेदवारी अर्ज भरून न्याय मागणार आहे. मायबाप जनतेला त्यांचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे की, पुन्हा एखाद्या घराण्याचा घरगडी निवडून द्यायचा आहे, याचा फैसला मायबाप जनताच करेल, याची मला खात्री आहे. पक्षाने केलेल्या अन्यायाविरुद्ध जनताच न्याय करेल, अशी प्रतिक्रिया आमदार लहू कानडे यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या