Tuesday, March 25, 2025
HomeनगरShirdi Assembly Election Result : शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचा दणदणीत...

Shirdi Assembly Election Result : शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचा दणदणीत विजय!

राहाता । तालुका प्रतिनिधी| Rahata

मतदार संघात राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दणदणीत विजय मिळविला. सलग आठव्यांदा विधानसभेवर ते निवडून गेले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांचा 70 हजार 282 मतांनी पराभव केला. या निकालाने शिर्डी मतदार संघावर विखे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सिध्द झाले आहे. ना. विखे पाटील यांचे पारंपारिक विरोधक बाळासाहेब थोरात यांनी गणेश कारखान्याची सत्ता मिळवून विखेंविरुद्ध शिर्डी मतदार संघात पाय रोवण्याचा प्रयत्न केला. मात्र विखे पाटलांनी संगमनेरातूनच थोरातांना हद्दपार करत नगरमध्ये विखे पाटलांचीच हवा असल्याचे सिद्ध केले. विखे समर्थकांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.

- Advertisement -

शनिवारी सकाळी 8 वाजता राहाता तहसील कार्यालयाच्या आवारात कडक बंदोबस्तात निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू झाली. अवघ्या काही वेळात पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. पहिल्या फेरीत विखे यांनी 2297 मतांची आघाडी काँग्रेसच्या सौ. घोगरे यांच्यावर घेतली. ही आघाडी सलग 20 फेर्‍यांपर्यंत कायम राहिली. गणेश परिसरातील सावळीविहीरच्या मतदान केंद्रांपासून फेरी सुरू झाली. विखे यांना पहिल्या फेरीत 6192 मते तर प्रभावती घोगरे यांना 3885 मते मिळाली. या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे असलेले भाजपाचे बंडखोर उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांना या फेरीत अवघे 62 मते मिळाली. विखे यांना पहिल्या फेरीपासून सुरु असलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली.

शेवटच्या 20 व्या फेरी अखेर पोस्टल बॅलेटसह ना. विखे पाटील यांना 1 लाख 44 हजार 778 मते, प्रभावती जनार्दन घोगरे यांना 74 हजार 496 मते मिळाली. मोहम्मद इसाक इब्राहिम शाह 407, राजू सादिक शेख 643, डॉ. राजेंद्र मदनलाल पिपाडा 1510, मयुर संजय मुर्तडक 138, रामनाथ भाऊसाहेब सदाफळ 143, रेश्मा अल्ताफ शेख 235 मते असे इव्हीएम मधील मते मिळाली. विखे पाटील यांना 70 हजार 282 चे मताधिक्य मिळाले. या निकालाने शिर्डी विधानसभा मतदार संघात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आठव्यांदा वर्चस्व सिध्द झाले आहे. पहिल्या फेरीपासूनच विखे पाटील यांना मतांची निर्णायक आघाडी होती. कार्यकर्त्यांनी पहिल्या फेरीपासूनच गुलालाची उधळण सुरु केली होती. माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील हे मीडिया सेंटरमध्ये ठाण मांडून होते.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे दहाव्या फेरीनंतर मोजणी केंद्रावर आगमन झाले. या कालावधीत तहसील कार्यालयापासून तर नगर-मनमाड रस्त्यापर्यंत कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. जसजशी निकालाची आकडेवारी येत गेली तसतसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद साजरा केला. ना. विखे यांच्या मताधिक्यांची कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. कार्यकत्यार्ंनी माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना उचलून घेत विजय साजरा केला. त्यातच संगमनेरचा निकालही कळाल्याने खताळ यांच्या विजयाचाही जल्लोष कार्यकर्त्यांनी साजरा केला. ना. विखे पाटील यांनीही कार्यकर्त्यांत विजय साजरा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता, शिर्डी, लोणी पोलीस ठाणे तसेच गुजरात पोलीस इतर संरक्षण यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता. विखे पाटील यांच्या समर्थकांनी नगर-मनमाड रोडवर ना. विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची मिरवणूक काढल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. दोन्ही बाजुने दोन दोन किमी अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...