Sunday, November 24, 2024
Homeनगरविधानसभा मतदार संघनिहाय आज अंतिम मतदार यादी

विधानसभा मतदार संघनिहाय आज अंतिम मतदार यादी

प्रारूप यादीत 36 लाख 73 हजार 969 मतदार || निवडणुकीच्या घोषणेकडे सर्वांच्या नजरा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाला मतदार यादी कार्यक्रम आखून दिला होता. त्यानूसार जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ यांनी मंगळवार (दि.6) रोजी नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली होती. मतदार यादीवर दाखल हरकती आणि दावे यांच्यावर सुनावणी झाली असून अनेक ठिकाणी नव्याने नाव नोंदणी अथवा नावे वगळण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज शुक्रवार (दि. 30) रोजी जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. दरम्यान प्रारूप मतदार यादीत जिल्ह्यात जिल्ह्यात 36 लाख 73 हजार 969 मतदार होते. यात 19 लाख 4 हजार 49 पुरूष तर 17 लाख 69 हजार 720 महिला मतदार तर 200 इतर मतदारांचा समावेश होता.

- Advertisement -

6 ऑगस्टला जिल्ह्याची प्रारूप मतदार प्रसिध्द करण्यात आली होती. या मतदार यादीत सर्वाधिक मतदार हे शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात 3 लाख 63 हजार 88 होते. त्या खालोखाल पारनेर मतदारसंघात 3 लाख 42 हजार 562 मतदारांचा समावेश होता. जिल्ह्यात सर्वात कमी मतदार हे अकोले मतदारसंघात 2 लाख 59 हजार 765 होते. नेवासा तालुक्यात 2 लाख 75 हजार 436 मतदार आहेत. नगर जिल्ह्यात मतदानाच्या वेळी गर्दी होवू नयेत, मतदानात आणखी सुसूत्रता यावी, यासाठी 34 ठिकाणी नव्याने मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात पूर्वी 3 हजार 731 मतदान केंद्र होती त्यात आता वाढ होवून 3 हजार 763 मतदान केंद्र होणार आहेत.

दरम्यान, आज प्रसिध्द होणार्‍या मतदार यादीनंतर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभाग जवळपास सज्ज होणार आहे. संकेतानूसार अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यावर एक महिन्यांत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असते. त्यानूसार राज्यात सप्टेंबरअखेर अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मतदार यंत्राची तपासणी जवळपास पुर्ण झाली आहेत.

अशी होती प्रारूप मतदार यादी
अकोले 1 लाख 36 हजार 397 पुरूष आणि 1 लाख 23 हजार 367 महिला एकूण 2 लाख 59 हजार 765 मतदार. संगमनेर 1 लाख 45 हजार 270 पुरूष आणि 1 लाख 35 हजार 777 महिला एकूण 2 लाख 81 हजार 47 मतदार. राहाता 1 लाख 44 हजार 233 पुरूष आणि 1 लाख 36 हजार 112 महिला एकूण 2 लाख 80 हजार 352 मतदार. कोपरगाव 1 लाख 42 हजार 901 पुरूष आणि 1 लाख 38 हजार 440 महिला एकूण 2 लाख 81 हजार 347 मतदार. श्रीरामपूर 1 लाख 53 हजार 643 पुरूष आणि 1 लाख 49 हजार 401 महिला एकूण 3 लाख 3 हजार 104. नेवासा 1 लाख 43 हजार 494 पुरूष आणि 1 लाख 31 हजार 937 महिला एकूण 2 लाख 75 हजार 436 मतदार. शेवगाव-पाथर्डी 1 लाख 90 हजार 302 पुरूष आणि 1 लाख 72 हजार 781 महिला एकूण 3 लाख 63 हजार 88 मतदार. राहुरी 1 लाख 63 हजार 669 पुरूष आणि 1 लाख 49 हजार 560 महिला एकूण 3 लाख 13 हजार 230 मतदार. पारनेर 1 लाख 77 हजार 509 पुरूष आणि 1 लाख 65 हजार 50 एकूण 3 लाख 42 हजार 562 मतदार. नगर शहर 1 लाख 56 हजार 31 पुरूष आणि 1 लाख 49 हजार 238 महिला एकूण 3 लाख 5 हजार 376 मतदार. श्रीगोंदा 1 लाख 72 हजार 879 पुरूष आणि 1 लाख 57 हजार 792 महिला एकूण 3 लाख 30 हजार 674 मतदार. कर्जत-जामाखेड 1 लाख 77 हजार 721 पुरूष आणि 1 लाख 60 हजार 265 महिला एकूण 3 लाख 37 हजार 789 मतदार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या