Sunday, November 24, 2024
HomeनाशिकAssembly Elections 2024 : नाशिक जिल्ह्यातील १५ जागांसाठी २०० उमेदवार रिंगणात; १३७...

Assembly Elections 2024 : नाशिक जिल्ह्यातील १५ जागांसाठी २०० उमेदवार रिंगणात; १३७ जणांनी घेतली माघार

नाशिक | Nashik

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या (Mahayuti and Mahavikas Aagahdi) उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे महायुती आणि मविआच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपआपल्या पक्षातील बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरु होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांकडून उमेदवारांची मनधरणी केली जात होती. अखेर वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडीचे बंड शमले; डॉ.हेमलता पाटील यांची माघार

त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १५ विधानसभा मतदारसंघातील लढतींचाही समावेश आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातून ३३७ उमेदवारांनी (Candidate) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज माघारीच्या शेवटच्या दिवशी १३७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता १५ विधानसभा मतदारसंघात २०० उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी उमेदवार कळवण विधानसभा मतदारसंघात आहेत.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला दिलासा मिळणार; ‘हे’ दोन तगडे नेते माघार घेणार?

यात मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात (Malegaon Outer Assembly Constituency) २१, नांदगावमध्ये १४, मालेगाव बाह्य १३, बागलाण १७, कळवण ०७, चांदवड १४, येवला १३, सिन्नर १२, निफाड ०९, दिंडोरी १३, नाशिक पूर्व १३, नाशिक मध्य १०, नाशिक पश्चिम १५, देवळाली १२, आणि इगतपुरीत १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना पाहायला मिळणार आहेत.

हे देखील वाचा : Nashik Political : दिंडोरीतून शिवसेनेच्या धनराज महालेंची माघार; देवळालीत अहिरराव शेवटपर्यंत ‘नॉट’ रिचेबल

आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाशिक मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या (Congress) डॉ. हेमलता पाटील, राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे, मनसेचे अंकुश पवार, अपक्ष उमेदवार गुलजार कोकणी, हनिफ बशीर, यांच्यासह ११ उमेदवारांनी माघार घेतली. तर नाशिक पश्चिमतून भाजपचे दिलीप कुमार भामरे, छावा क्रांतीवर संघटनेचे करण गायकर, महेश हिरे, शशिकांत जाधव, डॉ.डी.एल.कराड, हर्षा बडगुजर,किरण थोरात यांनी माघार घेतली.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक पश्चिम मतदारसंघातून ‘या’ उमेदवारांनी घेतली माघार

तसेच इगतपुरी मतदारसंघातून वामन खोसकर, अनिता घारे, संदीप जाधव, विष्णू दोबाडे, गोपाळ लहांगे, कावजी ठाकरे, नरेश घारे, जीवनकुमार भोये, वैभव ठाकूर आणि रवींद्र भोये यांनी आपले अर्ज मागे घेतले. तर सिन्नर विधानसभा मतदारसंघातून शीतल सांगळे, सीमंतीनी कोकाटे,नारायण मुठाळ, कृष्णा पोटे, भास्कर बिन्नर, डॉ.रावसाहेब जाधव, हरिभाऊ तांबे,वामन सांगळे, प्रविण जाधव, शेखर सानप यांनी माघार घेतली.

हे देखील वाचा : मोठी बातमी! अखेर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; महाविकास आघाडीच्या मागणीला यश

सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असणारे उमेदवार

माणिकराव शिवाजीराव कोकाटे (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस) उदय पुंजाजी सांगळे (शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस), शरद तुकाराम शिंदे (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), किशोर किसनराव जाधव (बसपा), अशोक चंद्रभान जाधव (रासप) , कैलास विश्वनाथ दातीर, भारत भाऊसाहेब आवारी, सागर दत्तात्रय सांगळे, शरद दामू धनराव, डॉ. राहुल विठ्ठल अहिरे, सागर पांडुरंग सांगळे, माधव गोविंद आव्हाड

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या