Tuesday, November 19, 2024
HomeनाशिकAssembly Elections 2024 : नाशिक जिल्ह्यातील ५० लाख मतदार निवडणार १५ आमदार

Assembly Elections 2024 : नाशिक जिल्ह्यातील ५० लाख मतदार निवडणार १५ आमदार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील (Assembly Constituencies) ५० लाख मतदार १५ आमदारांचे भवितव्य ठरवणार आहेत. या निवडणुकीत (Election) २६ लाख पुरुष तर २४ लाख महिला मतदार असल्याने यंदाच्या निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ किती परिणाम करते यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १५ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे नाशिक पश्चिममध्ये ४ लाख ८३ हजार ४९५ मतदार असून, ४१३ मतदान केंद्राच्या माध्यमातून मतदान करतील तर त्या खालोखाल ३३१ मतदान केंद्रातून नाशिक पूर्वमध्ये ४ लाख ९ हजार, २३९ मतदार मतदानाचा (Voting) हक्क बजावतील.

मतदारसंघ मतदान केंद्र पुरुष स्री एकूण मतदार
नांदगाव ३४१ १७८६०० १६४४५२ ३४३०५६
मालेगाव मध्य ३४४ १७६०३३ १६६६७० ३४२७१३
मालेगाव बाह्य ३५२ १९८११९ १८२३७६ ३८०५७६
बागलाण २८८ १५५३०८ १४३८०८ २९९११८
कळवण ३४८ १५२६३७ १४९३५९ ३०१९९६
चांदवड ३०६ १६०४३२ १४८३७६ ३०८८०८
येवला ३२८ १६९२८४ १५३७३५ ३२६६२३
सिन्नर ३३८ १६८४५९ १५५००५ ३२३४६४
निफाड २७८ १५२३९० १४६४७५ २९८८६८
दिंडोरी ३७३१६८१९३ १६०९३६ ३२९१३६
नाशिक पूर्व ३३१ २१००६६ १९९१६१ ४०९२३९
नाशिक मध्य ३०३ १७५१४० १७०१९६ ३४५३९३
नाशिक पश्चिम ४१३ २५७४०२ २२६०६७ ४८३४९५
देवळाली २७९ १४८९०० १३९२३९ २८८१४१
इगतपुरी ३०० १४३०६१ १३७४९३ २८०५५९
एकूण ४९२२ २६१४०९६ २४४६९६८ ५०६११८५

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या