Tuesday, November 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAssembly Elections 2024 : मतदानासाठी निवडणूक साहित्य रवाना

Assembly Elections 2024 : मतदानासाठी निवडणूक साहित्य रवाना

नाशिक | Nashik

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) उद्या (दि. २० नोव्हेंबर) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान (Voting) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकच्या (Nashik) शासकीय कन्या विद्यालयातून नाशिकमधील चार आणि इगतपुरी मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी नियोजित मतदान केंद्राकडे (Polling Station) मतदान अधिकारी व कर्मचारी यांना पोहोचवण्यासाठी सुसज्ज अशा वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व वाहनांमध्ये पोलीस बंदोबस्तात पुलिंग पार्टी नियोजित मतदान केंद्राकडे रवाना झाल्या आहेत. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतदानाचे साहित्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लगबग सुरु असल्याचे पाहायला मिळाले.

निफाड मतदारसंघातील साहित्य रवाना

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असणाऱ्या निफाड तहसील कार्यालय येथे उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आज निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मांदियाळी पाहायला मिळाली. तसेच महामार्गावरती पुलिंग बूथवर मतदान साहित्य नेण्यासाठी बस आल्याने बसची मोठी रांग पाहायला मिळाली. तर तहसील कार्यालयाच्या गेटवरती मोठ्या प्रमाणात मतदान साहित्य नेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गर्दी होती.

जिल्ह्यात ४,९२२ मतदान केंद्रे

नाशिक जिल्हाभरातील (Nashik District) १५ विधानसभा मतदार संघात ४ हजार ९२२ मतदान केंद्रे असून, मंगळवारी (दि.१९) सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्यांचे वाटप केंद्रातून केले जाणार आहे. जिल्हाभरात २७ हजार ७१ कर्मचारी निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, एक शिपाई, एक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

१,६१९ वाहनांची व्यवस्था

जिल्हातील १५ विधानसभा मतदारसंघात निवडणूक मतदानासाठी ७,०२६ बॅलेट युनिट, ५,८९९ कंट्रोल युनिट, तर ६,३९१ व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक साहित्यांसह मतदान अधिकारी, कर्मचारी यांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी ५११ बसेस, ९१ मिनी बसेस

मतदान केंद्रांवर विशेष नजर

जिल्हाभरातील ४ हजार ९२२ मतदान केंद्रांपैकी ३२८० मतदान केंद्रांवर विशेष यंत्रणा उभारण्यात आलेली असून, त्या माध्यमातून त्या मतदारसंघात सुरु राहणाऱ्या विविध घडामोडींच्या चित्रणाचे प्रत्यक्ष नियंत्रण जिल्हा प्रशासनाच्या कन्ट्रोल कक्षातून केले जाणार आहे. मतदान कक्षात मोबाईल नेण्याला बंदी करण्यात आलेली असल्याने प्रत्येकाने आपले मतदान ओळखपत्र अथवा मान्यताप्राप्त १२ ओळख पत्रांची सत्यप्रत सोबत बाळगणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या