Friday, April 25, 2025
Homeनगर3 लाख 84 हजाराच्या रोकडसह एकाला पकडले

3 लाख 84 हजाराच्या रोकडसह एकाला पकडले

आचारसंहिता लागू होताच पोलिसांची नगरमध्ये कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर दुसऱ्याच दिवशी कोतवाली पोलिसांनी नगर शहरात एका व्यक्तीला मोठ्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. अमरधाम परिसरात काल, बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ही रोकड नेमकी कशाची आहे, याची ठोस माहिती न देऊ शकल्याने कोतवाली पोलिसांनी आचारसंहितेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील कारवाई सुरू केली आहे.

- Advertisement -

बुधवारी रात्री अमरधाम परिसरात राहुल आदिनाथ शेरकर (वय ४४, रा. माळीवाडा, अहिल्यानगर) याला कोतवाली पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३ लाख ८४ हजार ३०० रुपये रोकड आढळून आली. आचारसंहिता काळात ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम बाळगण्यावर निर्बंध आहेत. सदर रक्कम कशाची आहे, कोठून आणली आहे, निवडणुकीशी याचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, संबंधित व्यक्तीला रकमेबाबत ठोस माहिती न देता आल्याने पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने पुढील कारवाई केली जात असल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...