Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कडक शब्दांत टीका केली होती. त्यानंतर आज विधानसभेत मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी आंतरवाली सराटी प्रकरणी एसआयटी (SIT) नेमण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणामागे राष्ट्रवादी असेल तर एसआयटीमार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisement -

यावेळी शेलार म्हणाले, महाराष्ट्र बेचिराख करण्याचे कोणी ठरवले? ही केवळ धमकी आहे का? या मागची भूमिका काय? यामध्ये संशय आहे का? यात कोणी कटकारस्थाने केली आहेत का? असे अनेक सवाल शेलार यांनी उपस्थित केले. तसेच कोर्टानेही तुम्ही गांभीर्याने घ्या. त्यामुळे शांत बसू नका, अशी विनंती शेलारांनी अध्यक्षांकडे केली. जरांगेंच्या भूमिकेमुळे मराठा समाजाची बदनामी होत असल्याचेही शेलार यांनी म्हटले.

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, जरांगेंनी माझ्यावरही खालच्या भाषेत बोलले पण आम्ही ऐकून घेतले. पण जरांगेंच्या विधानांमागे कोण आहे याची खरोखरंच एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, दुसरीकडे विधानपरिषदेत प्रवीण दरेकर (Praveen Darekar) हे देखील जरांगेंच्या विधानांवरुन आक्रमक झाले. त्यांनी देखील त्यांच्या विधानांमागे कोण आहे? याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना तात्काळ अटक करा, अशी मागणीही दरेकर यांनी केली. राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असे सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढायला हवे. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटीमार्फत चौकशी करावी, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या