Wednesday, January 7, 2026
Homeनाशिकघाटकोपर दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंत मदत

घाटकोपर दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंत मदत

-पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

मुंबई । प्रतिनिधी

वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमींना राज्य सरकारच्या वतीने अडीच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारकडून केला जाणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी दिली.

- Advertisement -

लोढा यांनी आज घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात जाऊन होर्डिंग दुर्घटनेतील जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी मदतीबाबत माहिती दिली. सद्यस्थितीमध्ये राजावाडी हॉस्पिटलमध्ये १ व्यक्ती अति दक्षता विभागात असून इतरांच्या प्रकृतीमध्ये समाधानकारक सुधारणा होत असल्याचे लोढा यांनी सांगितले.

YouTube video player

सदर जाहिरातीचे मोठे होर्डिंग हे पेट्रोल पंपाजवळ अनधिकृतरित्या बांधण्यात आले होते. महापालिकेने नोटीस बजावून सुद्धा होर्डिंग हटवण्यात आले नाही. त्याचे सेफ्टी ऑडिट किंवा तत्सम प्रक्रिया सुद्धा झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पोलीस पकडतील. त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. ही दुर्घटना नसून हत्या आहे, असेही लोढा यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

उमेदवाराच्या ओल्या पार्टीत ‘चखण्यावरून’ वाद?

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच, एका इच्छुक उमेदवाराच्या ‘ओल्या पार्टी’तून वाद निर्माण झाल्याची चर्चा सध्या...