Wednesday, April 8, 2026
Homeक्राईमNashik Fraud Crime : पहिला विवाह लपवून दुसरा संसार; 'मॅरेज फ्रॉड'मधून ४४...

Nashik Fraud Crime : पहिला विवाह लपवून दुसरा संसार; ‘मॅरेज फ्रॉड’मधून ४४ लाखांची लूट, सहा तोळे सोने गायब

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पहिल्या विवाहाची माहिती जाणीवपूर्वक लपवून दुसरा विवाह करत दुसऱ्या पत्नीसह तिच्या नातलगांना नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ४४ लाख ५४ हजार ४६६ रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) व सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

मुख्य संशयित महेश दिलीप वडार (वय ३२, रा. फ्लॅट नं. ए-१०३, पूर्वा रेसिडेन्सी, शिवसाई लेन, पिंपळे सौदागर, पुणे; मूळ रा. सांगवडेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे मुख्य संशयिताचे नाव असून त्याने पहिल्या विवाहाची माहिती लपवून फिर्यादी महिलेशी विवाह केला. संशयिताने पुण्यातील (Pune) आकुर्डीतील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, आकुर्डी (पुणे) येथे नोकरीस असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.

विवाहानंतर फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांना विविध कारणे सांगून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. सन २०२३ पासून ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत श्रमिकनगर, सातपूर, नाशिक तसेच पुणे परिसरात हा प्रकार घडला. वडार याने साथीदार अजय आणि शुभम् यांच्या मदतीने फिर्यादीच्या नवविवाहितेच्या नावावरून वेगवेगळ्या बँकांमधून ऑनलाईन कर्ज काढले. तसेच तिची आई, भाऊ, धाकटा भाऊ, बहिणीचा मुलगा, भाऊ व त्याचे मित्र यांच्याकडूनही रक्कम उकळली. एकूण ४४ लाख ५४ हजार रुपये विविध खात्यांतून व रोख स्वरूपात घेतल्याचे समोर आले आहे. याशिवाय फिर्यादीचे (FIR) सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने संशयिताने स्वतःच्या ताब्यात घेत अपहार केला.

कँटीनच्या टेंडरचे आमिष

वडार याने आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेजात अॅडमिन डिपार्टमेंटमध्ये नोकरी करतो असे सांगून नवविवाहितेच्या मालकीची कॅन्टीन सुरु केल्याचे खोटे व बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे, खोटे बिल व तिला दाखविले. असाच विश्वास संपादन करीत गंडा घातला, असे फिर्यादीत नमूद असून, संशयित अद्याप अटकेत नसून शोध सुरु आहे.

ताज्या बातम्या

MP Bhaskar Bhagare : खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका; खासदार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik देशातील शेतकरी (Farmer) सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून, १ एप्रिलपासून खतांच्या दरात झालेल्या वाढीमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर...