Friday, May 17, 2024
Homeनाशिकसहाय्यक पोलीस निरीक्षकांनी केली पूर परिस्थितीची पाहणी

सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी केली पूर परिस्थितीची पाहणी

चिंचखेड । वार्ताहर | Chinchkhed

आम्ही काय काय करायचे? कायदा सुव्यवस्था (law and order) अबाधित राहण्यासाठी रस्त्यावर चोवीस तास पहारा द्यायचा? व्हिआयपीची बडदास्त ठेवायची? कुठे काही विपरीत घडलं की तिकडे पावायचं? नैसर्गिक प्रकोप झाला की अध्यरात्री पळत सुटायचं? सामान्य मानसिकतेच्या मनात असे प्रश्न कदाचित निर्माण होतीलही.

- Advertisement -

पण सामान्यतले असामान्य मन अशा प्रधांना थारा देत नाही याचा अनुभव वणी पोलीस ठाणे (Vani Police Station) हद्दीतील नागरिक वनीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत (Assistant Police Inspector Swapnil Rajput) यांच्या माध्यमातून सातत्याने घेत आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) सर्वच नद्या नाले दुधडी भरून वाहत आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतो, तेव्हा दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) सर्वच नदी नाले दुधडी भरून वाहू लागतात.

चिंचखेड – जोपुळ धामणवाडी लोखंडेवाडी यांसह अनेक गावे पुराच्या विळख्यात सापडतात. ही बाब लक्षात घेऊन वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी मुसळधार पाऊस (heavy rain) चालू असताना वणी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्‍यांसह वणी पोलीस ठाणे हद्दीतील ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

तसेच काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने तेथील रस्ते वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या. चिंचखेड जवळके पुणेगाव लोखंडेवाडी धामणवाडी जोपुळ आदींसह अनेक गावात स्वप्निल राजपूत यांनी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या