Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसप्तशृंगी गडावर एटीएम सेवा बंद

सप्तशृंगी गडावर एटीएम सेवा बंद

भाविक, पर्यटकांना दहा किलोमीटरचा वळसा

ओझे । वार्ताहर Oze

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगीगडावर भारतीय स्टेट बँक व बँक ऑफ महाराष्ट्र या दोन राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम कार्यरत आहे. मात्र ते गेल्या दोन महिन्यांंपासून बंद असल्यामुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देऊन एटीएम सेंटर सुरू करावे, अशी मागणी भाविकांसह ग्रामस्थ करत आहेत.

- Advertisement -

एटीएम सेवा केंद्र असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. रविवारी, मंगळवारी, शुक्रवारी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे यात्रोत्सवकाळात लाखो भाविक हजेरी लावतात. एकीकडे शासनाकडून डिजिटल बँकिंग व्यवहार करा, असे आवाहन करत आहे. जवळ जास्त पैसे बाळगू नका. त्यामुळे चोरी होण्याची शक्यता असते अथवा पैसे कुणाकडून हरवतात. त्यामुळे ठिकठिकाणी शहरांमध्ये तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांना त्वरित पैसे काढता यावे यासाठी सप्तशृंगीगडावर दोन ठिकाणी एटीएम केंद्र उभारले गेले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

परंतु एकही एटीएम केंद्र चालू नसल्याने पैसे काढायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसाळताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून एटीएम सेंटर बंद अवस्थेत असल्यामुळे एटीएम प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत सप्तशृंगीगडावरील उपसरपंच संदीप बेनके यांनी सप्तशृंगीगडावर आठ दिवसांपूर्वी सर्व शासकीय विभागांची बैठक आयोजित केली होती.

यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित करून लवकरात लवकर एटीएम केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली. सप्तशृंगी निवासी ट्रस्ट कर्मचारी व रोपवे 700 ते 800 कर्मचारी यांचा दर महिन्याला पगार होतो. दर महिन्याला हे कर्मचारी या एटीएम केंद्रामधून आपला पगार काढत असतात. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ही एटीएम केंद्र बंद असल्याने नांदुरी येथे दहा किलोमीटर जाऊन पैसे खर्च करत एटीएम केंद्रात जाऊन पैसे काढावे लागत आहेत. त्यामुळे वेळही वाया जात आहे. संबंधित अधिकार्‍यांनी तत्काळ लक्ष देऊन एटीएम सेंटर सुरू करावे, अशी मागणी भाविकांसह ग्रामस्थ करत आहेत.

फिनिक्यूलर ट्रॉली रोपवे येथे कार्यरत असून माझा पगार दर महिन्याला होत असतो. परंतु येथील दोन्हीही एटीएम केंद्र गेल्या दोन महिन्यापासून बंद असल्यामुळे नाईलाजाने मला नांदूरी येथे दहा किलोमीटर एटीएम केंद्रावर जाऊन पगार काढावा लागतो.
मनोज देशमुख, स्थानिक कर्मचारी, सप्तशृंगगड

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...