मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
देवदर्शन करीत मालेगावी परतत असलेल्या मंत्री दादा भुसे यांचे पूत्र व युवा सेना नेते अविष्कार भुसे यांच्या बोलेरो वाहनावर पाठीमागून भरधाव वेगाने दोन वाहनातून येत असलेल्या संशयित गोवंश तस्करांच्या टोळीने हल्ला केला. एका वाहनाने कट मारल्याने भुसे यांचे बोलेरो वाहन दुभाजकावर धडकल्याने पुढचे चाक फुटले तर हल्लेखोरांची भरधाव वाहने ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुभाजकावर जावून आदळली. यात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. तर भुसे यांच्या चालकासह त्याचा मित्र तसेच ओव्हरटेक करणार्या वाहनातील चौघे जण जखमी झाले. गोवंश भरलेल्या आयशर वाहनास संरक्षण देण्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास मालेगाव-सटाणा रस्त्यावर टेहरे चौफुलीलगत असलेल्या स्वप्नपुर्ती नगर प्रवेशव्दारासमोर घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
सारडा परिवाराचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान
दरम्यान, छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुभाजकावर धडकलेली दोन्ही वाहने तसेच या वाहनातून जनावरे बांधण्यासाठी लागणारे दोरखंड, लाठ्याकाठ्या असे साहित्य जप्त केले असून घटनास्थळावरून पसार झालेले आयशर वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. या आयशरमधूनच गोवंश जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचा संशय असून पोलिसांतर्फे लंपास केले गेलेल्या जनावरांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी बोलेरो चालक कृष्णा भुषण पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून जखमी झालेल्या चौघांसह दुसर्या वाहनातून फरार झालेल्या अज्ञात तिघा-चौघांविरूध्द छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक महानगरपालिकेला मिळणार लवकरच नवे आयुक्त?
या घटनेसंदर्भात बोलेरो चालक कृष्णा पाटील याने छावणी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत आज पहाटे चार वाजेच्या सुमारास बोलेरो वाहन क्र. एम.एच.-15-एफ.टी.-5377 मधून अविष्कार भुसे व धीरज पवार या मित्रांसमवेत चिंतामणी गणेशाचे दर्शन घेवून मालेगावी परतत असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या वाहन क्र. एम.एच.-41-बी.एच.-0720 व स्विफ्ट कार क्र. एम.एच.-02-सी.एच.-4141 या दोन्ही वाहनात बसलेले इसम व तरूण जोरजोराने आरडाओरड करीत हॉर्न वाजवित कारच्या खिडकीतून हातवारे करीत बोलेरो बाजुला घेण्यास सांगत होते.
Nashik News : बेशिस्त वाहनचालकांना दणका; ४६० जणांवर कारवाई
एका वाहनाने ओव्हरटेक करतांना बोलेरोस दाबण्याचा प्रयत्न केला व त्या वाहनातील मागच्या सीटवर बसलेल्या एकाने लोखंडी रॉड बोलेरोच्या बोनेटवर मारण्यासाठी उगारला. त्यामुळे बोलेरोचा वेग आपण कमी केला असता याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येत असलेली स्विफ्ट कार उजव्या बाजुने ओव्हरटेक करीत बोलेरोला कट मारून दुभाजकावर जावून आदळली. तर बोलेरो दुभाजकाला घासत पुढे गेल्याने पुढचा टायर फुटला. याचवेळी दुसरे वाहन देखील ओव्हरटेकच्या प्रयत्नातच पुढे जावून दुभाजकावर जावून धडकले.
‘नीलकमल’ बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत – मुख्यमंत्री फडणवीस
दोन्ही वाहने दुभाजकावर जावून धडकल्याचे पाहताच परिसरातील नागरीक धावून आल्याने स्विफ्ट कार सोडून चालक व अन्य दोघे-तिघे पळून गेले तर दुसर्या वाहनातील मुदस्सीर खान, वसीम अहमद, तौफीक अहमद व मुश्रीफ अहमद (चौघे रा. मालेगाव) हे जखमी झाले. दोन्ही वाहनात जनावरे बांधणारे दोरखंड व लाठ्याकाठ्या मिळून आल्याने या चौघांना जनावरे तस्करी करणारे असल्याच्या संशयावरून नागरीकांनी मारहाण करीत पोलिसांना बोलवून त्यांच्या ताब्यात दिल्याचे नमूद केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दरम्यान, दुभाजकावर बोलेरो व कार धडकल्याने बोलेरोमधील चालक कृष्णा पाटील व त्याचा मित्र धीरज पवार हे तर कारमधील मुदस्सीर खान, वसीम अहमद, तौफीक अहमद व मुश्रीफ मोहंमद हे चौघे असे सहा जण जखमी झाल्याने या सहाही जणांना प्रयास हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.