Wednesday, May 22, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकातील डॉ. कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला

नाशकातील डॉ. कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला

पंचवटी | प्रतिनिधी

दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत असलेल्या सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज रात्री शुक्रवारी (दि. २३) रात्री नऊ वाजता घडली आहे. अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीर जखमी झाल्याने प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

- Advertisement -

दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर राठी यांवर सुयोग हॉस्पिटल असून डॉ शुक्रवारी रात्री राठी हॉस्पिटलमध्ये असताना एक अंदाजे ३० ते ३२ वयोगटातील संशयित डॉ. राठी यांना भेटण्यासाठी आला त्यावेळी डॉ. राठी व संशयित आरोपी यांच्यात बोलणे झाले व काही वेळाने पुन्हा दुसऱ्या कॅबिन मध्ये दोघेही चर्चा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी संशयित व डॉ. राठी यांच्यात शाब्दिक वाद झाले व संशयिताने कॅबिनची कडी लावून धारदार कोयता काढून राठी यांच्या डोक्यावर मानेवर जवळपास १५ ते २० वार केले. डॉ. राठी यांच्या कॅबिनमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्याने रुग्णालयाचा स्टाफ केबिनकडे धावत गेले त्यावेळी राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले मात्र प्रकृति चिंताजनक असल्याने रात्री राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

संशयित हल्ल्यानंतर पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून शोध सुरू केला आहे संशयिताने राठी यांच्यावर हल्ला का केला याचे मुख्य कारण समजू शकले नाही.

सुयोग हॉस्पिटलचे संचालक राठी यांच्यावर प्राण घातक हल्ला झाल्याचे समजतात घटनास्थळी परिमंडळ २ पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव , पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड , यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

यावेळी डॉक्टर राठी यांच्या मित्रपरिवार मोठी गर्दी केली होती. घटनेनंतर , गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी हॉस्पिटल मधील सीसीटिव्ही फुटेज पाहणी करून हल्ला केलेल्या संशयिताच्या शोधार्थ पथक रवाना झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या