Sunday, November 17, 2024
Homeनाशिकलोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये राडा; निलेश लंकेंच्या समर्थकावर हल्ला, गाडीही फोडली

लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये राडा; निलेश लंकेंच्या समर्थकावर हल्ला, गाडीही फोडली

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार निलेश लंके यांचे समर्थक सहकारी राहुल झावरे यांच्यावर गुरूवारी (दि.6) रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान पारनेर शहरातील बसस्थानक परिसरातील आंबेडकर चौकात काही अज्ञातांकडून जबर मारहाण व जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.वेळीच पोलिसांनी दखल घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

- Advertisement -

नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार लंके व भाजपचे खासदार सुजय विखे यांच्यात लढत होऊन लंके यांनी विजय संपादन केला आहे. विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण पेटले असून एकमेकांचे समर्थक आमने सामने आले आहेत. त्यातच लंके यांचे सहकारी झावरे हे पारनेर शहरातील आंबडेकर चौकातून बसस्थानकाजवळ जात असताना अचानक त्यांच्यावर काल दुपारी एकच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात झावरे यांना मारहाण झाल्याने ते जखमी झाले आहेत. तर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने नागरिकांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर पळून गेले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संशांवरून पारनेर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. झावरे यांना उपचारांसाठी अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती समजताच खा. लंके यांनी अहमदनर येथील रुग्णालयात जाऊन झावरे यांची भेट घेत विचारपूस केली.

हा नियोजीत कट
राजकारण हा खेळ असतो यात जय पराजय होतो. तो आनंदाने पचवता आला पाहिजे. या लोकांना पराभवच मान्य नसल्याने अशा घटना घडत आहेत. ज्यांनी हल्ला केला ते सराईत आहेत. यामुळे हा राजकीय कारणातून नियोजीत कट करून हल्ला झाला आहे. आमचे सहकारी पोलीस अधिक्षकांना भेटून हल्लेखोरांवर कडक कारवाईची तसेच गुन्हेगारीचा बिमोड करण्याची मागणी करणार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या