सिन्नर | Sinner
येथील सिन्नर-शिर्डी (Sinner-Shirdi) लगत असलेल्या मुसळगाव एमआयडीसी जवळील सारस्वत बँकेचे एटीएम (ATM) फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली असून पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मशीन फोडण्याचा प्रयत्न करून याठिकाणच्या सुरक्षारक्षकास मारहाण केली. मात्र, चोरट्यांना रोकडचा कॅशवार्ड खोलण्यात अपयश आल्याने रक्कम वाचली असून एटीएम मशीनचे मोठे नुकसान झाले आहे…
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चौघा चोरट्यांनी (Thieves) एटीएममध्ये प्रवेश करत सुरक्षारक्षकास मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व एटीएम मशीन बाहेर ओढून काढली. त्यानंतर चोरट्यांनी एटीएमची तोडफोड केली. मात्र, मशीनचा कॅशवार्ड उघडता न आल्याने त्यांना त्यातील रक्कम काढता आली नाही. यानंतर सुरक्षारक्षकाने सकाळी सहा वाजता याबाबत एमआयडीसी पोलिसांना (MIDC Police) माहिती दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे (Police Station) पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर, भगवान शिंदे, रोहित सानप, नवनाथ चकोर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तर याठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये सर्व दृश्य दिसत असून त्यात चौघेजण कैद झाले आहेत. तर याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपासासाठी पथके रवाना झाले आहेत.