Friday, May 3, 2024
Homeनाशिकविकास कामांतून मतदारांचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न -बावनकुळे

विकास कामांतून मतदारांचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न -बावनकुळे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सत्ता हे साधन आहे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी साधन म्हणूनच त्याचा उपयोग प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. विधानमंडळासाठी आमदार हा जनतेचा वकील असतो आणि प्रत्येक नागरिकांनी दिलेलं मत हे कर्ज समजून पाच वर्षात व्याजासहित परत करण्याचं काम आमदाराचे असतं ते काम आमदार सीमा हिरे प्रामाणिकपणे करीत असल्याचा निर्वाळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

- Advertisement -

सातपूर बस स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस विजयकुमार चौधरी, रवी अनासपुरे, अजित चव्हाण, केदानांना आहेर, गिरीश पालवे, माजी आ.बाळासाहेब सानप, आमदार राहुल ढिकले, विजय साने, लक्ष्मण सावजी, दिनकर पाटील, मंडल अध्यक्ष भगवान काकड, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, इंदुमती नागरे आदींसह मान्यवर होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रथमत: आमदार सीमा हिरे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या अशोक नगर भाजी मार्केटच्या डोमचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर सातपूर बस स्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.

प्रास्ताविकात आमदार सीमा हिरे यांनी पश्चिम नाशिकच्या विकास कार्याचा आढावा सादर केला. सातपूर विभागात केलेल्या विविध विकास कामांची माहिती सांगितली बसस्थानकाची गरज लक्षात घेऊन केलेल्या कामाची त्यांनी सविस्तर माहिती लोकांपुढे सादर केली.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान मंडळात आपण योग्य आमदारांना मतदान देऊन पाठवला आहे आपल्या विभागातील कामांची पूर्तता कशा पद्धतीने करायची त्याची जाण असणारा प्रतिनिधी आपण दिला आहे.सरकारने आपल्या अर्थसंकल्पात केलेल्या विविध विकास कामांचा गोषवारातील यावेळी मांडला त्यात प्रामुख्याने नाशिक पुणे एक्सप्रेस रेल्वे, सारथी प्रकल्प, टिटवी धरणाचे काम, विमानतळाचे प्रश्न यासारख्या नाशिकच्या विविध कामांना अर्थसंकल्पात न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटच्या माणसांचे काम करण्यासाठी हे सरकार कटीबद्ध आहे फेसबुक सरकार नव्हेे तर तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन काम करणारे सरकार असल्याचा त्यांनी सांगितले.

बसस्थानकातून लांंब पल्लाच्या गाड्या

सातपूर बस स्थानकातून सातपूर नंदुरबार ही पहिली बस मान्यवरांच्या हस्ते सुरू करण्यात आली सातपूर बसस्थानकारावरून यापूढे पालघर, पुणे, कसारा व नंदूरबार या ठिकाणांसाठी सुरुवातीच्या काळात बसेस सुरू होणार असून नंतरच्या काळात विविध ठिकाणासाठीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू केल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बस स्थानकाच्या पुर्णत्वासाठी सामजिक कार्यकर्ते नरेंद्र पुणतांबेकर यांनी सततचा पाठपुरावा केला होता. दरम्यान बस स्थानकाच्या नूतन वास्तूत नरेंद्र पुणतांबेकर यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण पूजन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या