Monday, June 9, 2025
Homeभविष्यवेधआचार्य आनंद ऋषीजी यांच्या हस्त व तळपायावरील शुभ चिन्हे!

आचार्य आनंद ऋषीजी यांच्या हस्त व तळपायावरील शुभ चिन्हे!

आनंद ऋषीजींच्या तळहातावरील व तळपायावरील शुभ चिन्हांचा उल्लेख व त्याचे कारकत्व देत आहे. या लेखात हातावरील रेषा व ग्रह यांचे विश्लेषण दिलेले नाही कारण आचार्यांच्या उपलब्ध हाताचे उपलब्ध फोटो स्पष्ट नाहीत, त्यामुळे फक्त चिन्हांचाच उल्लेख आहे. उपलब्ध फोटोंमध्ये हाताने काढलेल्या आकृतीत हस्त रेषा आहेत, परंतु हस्तरेषा व चिन्हे यांचे एकत्रित कारकत्व लेखात द्यायचे ठरवले तर ते लेखासाठी असलेल्या शब्दांच्या मर्यादेत बसू शकत नाहीत. आचार्यांच्या हातावरील रेषा अत्यंत शुभ आहेत.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

- Advertisement -

आचार्यांच्या बोटांवरील प्रातिनिधिक स्वरूपातील ठश्यांच्या आकृतीवरून त्यांच्यात असलेले दैवी गुण प्रगट होत आहेत. ते चिन्हांचे कारकत्वानंतर मी लेखात समाविष्ट केले आहेत. कारण या बोटांवरील ठश्यांचे आजपर्यंत कोणीही कारकत्व दिलेले नाही, असे मला वाटते. भारतीय पुरातन हस्तसामुद्रिक ग्रंथात शुभ चिन्हांचा उल्लेख आहे, त्यांचे वर्णन आहे. शुभ चिन्हे हे विशिष्ठ योगाची चिन्हे असतात.

या शुभ योगांच्या चिन्हांनी व्यक्तीची महानता अजमावता येते. आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचे हस्त व पद यावरील शुभ चिन्हे मला एका भक्ताने दाखविली व ते म्हणाले की, याची महानता तक्त्यात वर्णन केल्याप्रमाणे आहे का? माझी उत्सुकता होती की, आचार्य यांच्या तळहातावरील व तळपायावरील चिन्हे खरोखरच अत्यंत शुभकारक आहेत का? कारण सामान्य माणसाच्या किंवा स्वतःला महाराज किंवा अवतारी महापुरुष म्हणवून घेणार्‍या बर्‍याच तथाकथित बुवा, गुरूंच्या तळहातावर, आचार्य यांच्या हातावर आहेत तसे एखादेसुद्धा अति शुभ चिन्हे मला आजवर आढळली नाहीत.

पद चिन्हे तर पाहणे खूपच मुश्किल आहे कारण त्यासाठी तळपाय धूळ व चिरा मुक्त हवेत. शिवाय अत्यंत कोमल व हाताएवढे स्वच्छ असावे लागतात. निरनिराळ्या आखाड्यांचे गुरु किंवा प्रमुख, श्री श्री रविशंकर, रामदेव बाबा, अम्मा भगवान,सद्गुरू आचार्य, सत्य श्री साई बाबा इत्यादी आचार्य व महागुरूंचे हातांचे परीक्षण करण्याचा योग आला. त्यांच्या हातांचे हस्तसामुद्रिकदृष्टया परीक्षणाअंती भविष्यवेधमध्ये लेख लिहिले आहेत. परंतु आनंद ऋषीजी महाराज यांच्या हस्त व पद चिन्हे जी त्यांच्या प्रत्यक्ष तळहाताच्या व तळपायाच्या फोटोतून, रेखा रुपी रेखाटली आहेत, असे चिन्हे आजपर्यंत कुठल्याही गुरु महाराज किंवा व्यक्तीच्या हातावर मी पाहिली नाहीत किंवा हस्त परीक्षणादरम्यान मला आढळून आली नाहीत.

डाव्या व उजव्या हातावरील शुभकारक चिन्हे- सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या हातावर चौकोन, त्रिकोण, त्रिशूल,नक्षत्र, यव, तीळ, बिंदू, जाळी, फुली, हे चिन्हे पाहावयास मिळतात. मत्स्य चिन्ह हे खूपच कमी संख्येने आढळते. स्वस्तिक, मंदिर,पद्म, ध्वज,अंकुश पालकी हे चिन्हे मी आजवर कुठल्याही हातावर पहिली नाहीत. स्वस्तिक, मंदिर, पद्म, ध्वज, अंकुश पालकी यांचे चित्र व त्यांचे कारकत्व फक्त पुस्तकातूनच वाचले आहे. आजवर 60

हजाराच्यावर हातांचे परीक्षण केले आहेत. त्यात अनेक धार्मिक महागुरू, बॉलिवूड सुपरस्टार, अनेक राष्ट्रांचे प्रमुख, मोठे राजकारणी, मंत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडू इत्यादींच्या हातावर मला स्वस्तिक, मंदिर, पद्म, ध्वज, अंकुश पालकीसारखे चिन्ह आढळले नाहीत.

दोनही तळपायांवरील शुभ चिन्हे- स्वस्तिक, मंदिर, पद्म, ध्वज,अंकुश पालकी सारखे चिन्हे असता त्यांचे हातावर कुठल्या ग्रहावर अथवा ते कुठल्या रेषेवर आहेत, त्या नुसार या चिन्हांचे कारकत्व किती प्रमाणात शुभ आहे ते कळते. थोडक्यात स्वस्तिक चिन्ह हे जर गुरु ग्रहावर म्हणजे पहिल्या बोटाच्या खालील फुगीर भागावर असेल तर त्याचे कारकत्व हजार पटीने वाढते. शनी ग्रहावर मंदिर, रवि ग्रहावर ध्वजाचे चिन्ह असताही यांचे कारकत्व हातावर इतरत्र असण्या पेक्ष्या खूप अधिक महान असते. व ते आचार्यांच्या दोनही हातावर गुरु ग्रहावर आहेत. थोडक्यात हातावरील चिन्ह व त्याचे स्थान हातावर कोठे आहे हे खूप महत्वाचे असते व त्या नुसार त्या चिन्हाचे शुभत्व किती याचे विश्लेषण होते. हि सर्व अति शुभकारक चिन्हे आचार्यांच्या अनुक्रमे – गुरु ग्रहावर स्वतिक,शनी ग्रहावर मंदिर व रवी ग्रहावर ध्वज चिन्हे दोनही हातांवर आहेत.

तळ पायावरील पद्म चिन्ह – खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण दोन चौकोन एकत्रं येऊन होणार्‍या चांदणीसारख्या आकाराला पद्म म्हणून ओळखले जाते. ह्या पद्म चिन्हांचा आकार सुद्धा मत्स्य चिन्हाच्या आधारे आहे. या मत्स्य चिन्हाने दोन त्रिकोणाच्या बाजू साकारल्या आहेत व त्रिकोण पूर्ण केला आहे . त्रिकोण चिन्ह हस्तसामुद्रिकशास्त्रानुसार तळहातावर कोठेही असू देत ते शुभ फलितच देते. पायावरील डमरू चिन्ह वैराग्याबरोबर गूढ संकेत देते किंवा होणार्‍या घटनांची आगाऊ सूचना देते. पालकी चिन्ह हे यव चिन्हासारखे भासत असेल तरी दोन अर्ध गोलाकार रेषांनी बनलेले त्यातली खालची रेषा थोडी गोलाकार व पालकीच्या आकारला दोन्ही बाजून दोन फाटे असा आकार घेतलेले हे चिन्ह अत्यंत दुर्मिळ आहे. आचार्य यांच्या हातांच्या आकृतीत बोटांच्या पहिल्या पेर्‍यावरील ठशांच्या मूळ आकाराच्या ठश्यांची प्रातिनिधिक रचना दिली आहे. या रचना बोटांवरील संपूर्ण ठशांचे प्रतिनिधित्व करतात व हे बोटांवरील ठसे विशेतः उजव्या हाताच्या पहिल्या गुरु बोटांवरील व दुसर्‍या शनिच्या बोटांवरील अलौकिक दैवी ज्ञान प्राप्तीचे आहेत. आनंद ऋषीजी महाराज यांना ध्यानधारणेत व परमेश्वरी आराधनेत या दोन शंख आकाराच्या उजव्या हाताच्या पहिल्या व दुसर्‍या बोटांवरील ठश्यांच्या चिन्हांमुळे ध्यानाला बसताना किंवा ध्यान धारणेत त्यांचा लगेचच संपर्क त्यांच्या आराध्य देवाशी होत असणार आहे.

हस्तसामुद्रिकशास्त्रात पहिले बोट हे गुरु ग्रहाच्या कारकत्वाचे असते, गुरु ग्रहावरील हे बोट गुरु ग्रहाच्या देणार्‍या फलितांवर शुभ अशुभ परिणाम घडवीत असते. गुरु ग्रहावरील बोट त्यावरील पेरे व पहिल्या पेर्‍यावरील ठसा हा कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार गुरु ग्रहाचे फलित बदलत असत.

सामान्यतः शंख,चक्र व शुक्ति, मयूर पंखी, व दोन शंख एकत्र असलेले ठसे बोटांवर असतात, या ठश्यां पैकी आज आपण फक्त शंख या ठश्याचे मानवी व्यक्तिमत्वावर होणारे परिणाम पाहणार आहोत. शंख ठश्याला शेपूट असते किंवा शंख ठश्यांच्या रेषांचा शेवट हा हाताच्या करंगळी कडे असावा असा सर्व सामान्य नियम आहे व शंख ठश्यांचा ओघ किंवा त्याचे शेपूट अंगठ्याकडे गेलेले नसावे. सामान्य व्यक्तींच्या हाताच्या बोटांवर शंख ठसा असता व त्याचा ओघ हा करंगळीकडे जाणारा असेल तर ठश्याचे उत्तम फलित लाभते. हातावर शंख ठसा हा मेहनती,सामाजिक व अनुशासन व कुठल्याही परिस्थितीत तग धरून जीवन जगत राहणारा म्हणून या शंख छापाचे कारकत्व आहे. शंख ठसा हा चारही बोटांच्या पहिल्या पेर्‍यावर अनुक्रमे गुरु,शनी,रवी व बुध ग्रहावर असता त्या त्या ग्रहांचे कारकत्व शंख ठश्याला प्राप्त होत असते.

शंख ठसा सामान्य व्यक्तीच्या बोटांवर असतांना त्याचे शेपूट किंवा ओघ हा जर अंगठ्याकडे जाणारा असेल तर त्या व्यक्तीमध्ये त्या बोटाखालील ग्रहांचे जगापेक्षा एक वेगळे व तर्‍हेवाईक कारकत्व लाभते. आनंद ऋषीजी यांच्या हातावर पहिल्या व दुसर्‍या बोटांवरील शंख छापाचा ओघ हा अंगठ्याकडे आहे. माझ्या पाहण्यात फक्त पहिल्या बोटांवरील म्हणजे गुरु ग्रहाच्या बोटांवरील शंख छाप हा अंगठ्याकडे ओघ असलेला काही मोजक्या अध्यात्मिक उंची असलेल्या व क्षणात परमेश्वरी ध्यान धारणेत तल्लीन होणार्‍या व्यक्तींच्या हातावरचा मी अभ्यासाला आहे. आनंद ऋषीजी यांच्या हातावरील रेषा, चिन्हे हि देवत्व प्राप्त असलेल्या व्यक्तीच्या हातांवर असावीत तशी आहेत. इच्छा, आकांक्षा,

क्रोध, मत्सर, काम भावना व सर्व इंद्रियांवर विजय प्राप्त असलेले महान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांच्या टोकांवर असलेल्या शनि ग्रहावरील अंगठ्याकडे ओघ असणारा शंख छाप हा आजपर्यंत मी कोणाच्याही बोटावर पाहिला नाही. शनि ग्रह वैराग्य देतो व आनंद ऋषी महाराज बाल ब्रह्मचारी होते, गुरु बोटांवरील शंख छाप हा अध्यात्म्य, ध्यान धारणा यातून परमेश्वराचे कायम दर्शन व सहवास मिळून देण्याचे कार्य करतो आहे व त्यामुळेच आनंद ऋषी महाराज यांचे हातावरील रेषा व चिन्हे हेच फक्त शुभदायी नसून त्यांच्या बोटांवरील शंख व चक्र असलेले ठसे हे सुद्धा अत्यंत दुर्मिळ असलेल्या रचनेचे होते.

ज्योतिष अधिवेशनाला मला भारतातून निमंत्रण येत असतात. मी हस्तसामुद्रिक अभ्यासक असल्याचे कळताच बरेचसे ज्योतिषी त्यांच्या हातावरील गुरू ग्रहावर स्वस्तिक चिन्ह असल्याचे पेनाने गिरवलेल्या आकृतीने काढून दाखवितात. तेव्हा त्यांच्या विद्वत्तेची कीव येते. कारण आजपर्यंत मी कुठल्याही जिवंत व्यक्तीच्या हातावर, त्यातल्या त्यात गुरु ग्रहावर स्वतंत्रपणे तयार झालेले स्वस्तिक चिन्ह पाहिले नाही. माझ्या मते स्वतिक चिन्ह आसल्याचा भास बर्‍याच विद्वानांनां होतो. परंतु प्रत्यक्षात तो भासच असतो. कारण स्वतिक चिन्ह इतके स्वस्त नाही कि ते सामान्य माणसाच्या हातावर यावे.

हस्त चिन्ह पहावयाचे असेल तर मी सर्व वाचकांना आधी विनन्ती करेन कि त्यांनी हातावरील शुभ-अशुभ चिन्ह शोधू नये. अगर उत्सुकता असेल तर उत्तम भिंगातून शोधून खात्री करावी. आचार्य आनंद ऋषीजी यांचे हातावर असलेले अत्यंत शुभकारक, अलौकिक व दुर्मिळ चिन्हे सामान्य व्यक्तीच्या हातांवर अथवा तळव्यावर सापडणे अशक्य आहे.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ९ जून २०२५ – सामाजिक की सार्वजनिक वृक्षारोपण?

0
जागतिक पर्यावरण दिवस सर्वांनी नुकताच साजरा केला. अलीकडच्या काळात हा दिवस आणि सामाजिक वृक्षारोपण उपक्रम या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. यात...