Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाआजपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड अ‍ॅशेस कसोटी मालिका

आजपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड अ‍ॅशेस कसोटी मालिका

नाशिक | सलिल परांजपे Nashik

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड Australia Vs England या दोन संघांमधील ५ सामन्यांच्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेला Ashes Test series आजपासून ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे ५:३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सीक्स वाहिनीवर करण्यात येणार आहे . ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद तेज गोलंदाज पॅट कमिन्स भूषवणार आहे. तर इंग्लंड संघाच्या नेतृत्वाची धुरा ज्यो रूटच्या खांदयावर असणार आहे.

- Advertisement -

मात्र ब्रिस्बेन कसोटीपूर्वी इंग्लंड संघाचा अनुभवी तेज गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे अंतिम ११ चा संघ निवडताना इंग्लंडला मोठी कसरत करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघानं आपला अखेरचा कसोटी सामना ११ महिन्यांआधी खेळला होता. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा फिरकीचा आधारस्तंभ नेथन लायन ४०० बळीचा टप्पा गाठण्यासाठी उत्सुक आहे. हा विक्रम रचण्यासाठी त्याला केवळ १ बळी मिळवणे गरजेचे आहे.

ऑस्ट्रेलिया संघाकडून ग्लेन मॅक्ग्रा आणि शेन वॉर्न यांनी हा पल्ला गाठला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आपला अंतिम ११ चा संघ रविवारी जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या डावाची सुरुवात करण्याची जवाबदारी मार्कस हॅरिस आणि डेविड वॉर्नरवर असणार आहे. तर मधल्या फळीतील जवाबदारी स्टीव्ह स्मीथ , मर्नास लबूशेन आणि ट्रेव्हिस हेड यांच्या खांदयावर असणार आहे. तर गोलंदाजीची मदार पॅट कमिन्स , जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क आणि नेथन लायन यांच्या खांदयावर असणार आहे.

इंग्लंड संघाला २०१०-११ मध्ये ५ सामन्यांच्या ऍशेस मालिकेवर ३-१ ने विजय मिळवता आला होता. या विजयात जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलिया संघातील सर्व फलंदाजांवर दडपण आणून इंग्लंडला मालिका विजय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.

मात्र जेम्स अँडरसन दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार असल्यामुळे तेज गोलंदाजीची भिस्त स्टुअर्ट ब्रॉडच्या खांदयावर असेल. त्याला साथ देण्यासाठी मार्क वूड , क्रिस वोक्स , ओली रॉबिन्सन आणि बेन स्ट्रोक्सच्या समावेशाने इंग्लंड संघ अधिक संतुलित दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या