Thursday, May 15, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाला धक्का, रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त ; शार्दुल ठाकूरला संधी

टीम इंडियाला धक्का, रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त ; शार्दुल ठाकूरला संधी

नवी दिल्ली –

- Advertisement -

भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्याने आगामी टी20 सामन्यांना तो मुकणार आहे.

त्याच्या जागी संघात शार्दुल ठाकूरला संधी मिळाली आहे.

पहिल्या टी-20 सामन्यात 44 धावा करणार्‍या रविंद्र जाडेजाला फलंदाजी करत असताना स्टार्कचा चेंडू जाडेजाच्या हेल्मेटवर लागला. त्यामुळे जाडेजा दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर टीम इंडियाची गोलंदाजी सुरू झाली तेव्हा जाडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली.

शनिवारी सकाळी जाडेजाच्या दुखापतीचे स्कॅनिंग झाले असून त्यानंतर त्याच्या उपचारांची दिशा ठरविण्यात येणार आहे. टीम इंडियाचे फिजीयो नितीन पटेल हे जाडेजाच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिकच्या सीपेट प्रकल्पासाठी विनामोबदला जमीन- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai नाशिक जिल्ह्यातील मौजे गोवर्धन येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) प्रकल्पासाठी जागा विनामोबदला देण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...