Friday, January 23, 2026
Homeदेश विदेशधक्कादायक! ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्ससोबत भर रस्त्यात अश्लिल वर्तन; विश्वषचक सामन्यापूर्वीच घडली घटना

धक्कादायक! ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्ससोबत भर रस्त्यात अश्लिल वर्तन; विश्वषचक सामन्यापूर्वीच घडली घटना

मुंबई | Mumbai
महिला वनडे विश्वचषक २०२५ च्या मॅचेस भारतामध्ये खेळवले जात आहेत. यादरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. यादरम्यान सेमीफायनलसाठी कोणते संघ एकमेकांविरूद्ध खेळणार या दृष्टीने महत्त्वाचे सामने होतील. मात्र यादरम्यान इंदूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. हॉटेल रॅडिसन ब्लू येथून एका कॅफेकडे जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटूंशी एका तरुणाने छेडछाडीचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सामना होणार आहे. त्याआधी, दोन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने विनयभंग केल्याचं वृत्त समोर आले आहे. तरुणाने त्यांची गाडी अडवून त्यांना चुकीचा स्पर्श केला, तसेच त्यांच्याशी अश्लील वर्तन केले. या गंभीर घटनेमुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खजराना रोडवर ही घटना घडली. दोन्ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एका कॅफेमध्ये जात होत्या. पांढरा शर्ट आणि काळी टोपी घातलेला एक दुचाकीस्वार त्यांच्या मागे लागला. तो वेगाने जवळ आला आणि एका महिला क्रिकेटपटूला अयोग्यरित्या स्पर्श केला. परदेशी खेळाडूंशी संबंधित या घटनेमुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे खेळाडू घाबरल्या आणि त्यांनी त्वरित आपल्या टीमचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्याशी संपर्क साधला. सिमन्स यांनी खेळाडूंना लाईव्ह लोकेशन आणि एसओएस अलर्ट पाठवण्यास सांगितले. त्यांनी संदेशात लिहिले की, ‘एक माणूस आमच्या मागे बाईकवरून येत आहे आणि पकडण्याचा प्रयत्न करत आहे.’ एसओएस संदेश मिळताच सुरक्षा अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी बाईकस्वार तरुणाला अटक केली आहे. या घटनेनंतर हॉटेल आणि कॅफेच्या आसपास सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

YouTube video player

आरोपी अटकेत
सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करत बाईकस्वार आरोपी अकील याला पकडले. सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्या तक्रारीनंतर एमआयजी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरु – मंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई केवायसी पूर्ण न...