मुंबई | Mumbai
आपल्या आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सूर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Birth Anniversary) यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांना आदरांजली वाहत आहे.
- Advertisement -
दरम्यान उत्तर प्रदेशातील अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर असलेल्या नयाघाट चौक आता ‘लता मंगेशकर’ चौक म्हणून ओळखला जाणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर असे नाव देण्यात आलेल्या स्मृती चौकाचे बुधवारी मुख्यमंत्री योगी यांनी लोकार्पण केले आहे.
सुमारे ८.५० कोटी रुपये खर्चून ३० दिवसांत हा चौक बांधण्यात आला आहे. तसेच १४ टन आणि ४० फुटाचा वीणा पुतळा बसवण्यात आला आहे.