Saturday, March 29, 2025
Homeक्रीडाIPL स्पॉन्सरशीप शर्यतीत आता बाबा रामदेव !

IPL स्पॉन्सरशीप शर्यतीत आता बाबा रामदेव !

नवी दिल्ली – New Delhi

आयपीएलचा (IPL) तेरावा हंगाम २९ मार्चपासून सुरू होणार होता, मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. अखेर आयपीएलचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर म्हणजेच युएइमध्ये होणार आहे. १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या या हंगामाला सुरुवात होणार असली तरी अद्याप या स्पर्धेसाठी स्पॉन्सर नाही आहेत. बीसीसीआयनं चिनी कंपनी वीवोकडून मुख्य प्रायोजकत्व काढून घेण्यात आले.

- Advertisement -

मात्र मीडिया रिपोर्टनुसार, बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयपीएल मुख्य प्रायोजकसाठी बोली लावू शकतात. इकनॉमिक्स टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, पतंजलीचे प्रवक्ते एसके तिजरवाला यांनी सांगितले की, ‘आम्हाला पतंजली हा जागतिक ब्रॅंड बनवायचा आहे आणि म्हणूनच आम्ही आयपीएल प्रायोजकत्वाबद्दल विचार करीत आहोत‘. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं वीवोकडून प्राजोकत्व काढून घेतल्याची घोषणा केली होती.

पतंजलीला होणार फायदा

तज्ज्ञांचे मत आहे की पतंजली हा जागतिक ब्रॅंड नाही. जर त्यांना आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व मिळाले तर त्यांना नक्कीच फायदा होईल. विवोनंतर जिओ, ऍमेझॉन, टाटा ग्रुप, ड्रीम ११ आणि बायजू या कंपन्यांही आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वाच्या शर्यतीत आहेत. बीसीसीआय आयपीएल -१३ च्या नवीन प्रायोजकांसाठी संपूर्ण पारदर्शकता आणि नवीन प्रक्रियेचे अनुसरण करणार आहे. त्यामुळे प्रायोजकांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया पाळली जाईल.

वीवोकडून बीसीसीआयला मिळायचे ४४० कोटी

बीसीसीआयने गेल्या आठवड्यात विवोबरोबरचा करार संपविण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये, विवो इंडियाने २१९९ कोटी रुपयांमध्ये आयपीएल टायटल प्रायोजकत्व अधिकार संपादन केले होते. करारानुसार कंपनीला प्रत्येक हंगामात बीसीसीआयला सुमारे ४४० कोटी रुपये द्यावे लागले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : समृद्धी महामार्गावर अपघात; दोन ठार, २ जखमी

0
वावी | वार्ताहर | Vavi समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) झालेल्या अपघातात (Accident) दोन जण ठार (Killed) झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली...