Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबबनराव लोणीकरांचा माफीनामा; "माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी…"

बबनराव लोणीकरांचा माफीनामा; “माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी…”

मुंबई | Mumbai
भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका भाषणादरम्यान सोशल मीडियावर सरकार आणि स्वतःच्या विरोधात टीका करणाऱ्या तरुणांविषयी आक्रमक शब्दांत संताप व्यक्त केला. “कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त म्हणतात,” असे म्हणत त्यांनी सडकून टीका केली. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही लोणीकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. बबनराव लोणीकर यांच्यावर टीका झाल्यानंतर आता त्यांना उपरती आली असून त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे.

बबनराव लोणीकर म्हणाले की, गाव पातळीवरचे काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, जे मोदीजींना आणि देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करतात. त्यांच्याविषयी मी बोललो. हे राजकीय पक्षाचे 10 जणांच्या टोळके, विरोध करतात. आमची खेड्यातली भाषा आहे. आम्ही वडिलांना बाप म्हणतो, आईला माय म्हणतो. एखाद्या मुलाने काम केले नाही, तू नीट शिकत नाही तर आम्ही त्याला कार्ट म्हणतो. ही आमची बोलीभाषा आहे. आमच्या ग्रामीण भाषेत मी बोललो आहे. मी कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात 40 वर्षात बोललो नाही. मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणारा माणूस आहे, असे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

मी शेतकऱ्यांविरोधात मरेपर्यंत बोलणार नाही
बबनराव लोणीकर पुढे म्हणाले की, राजकीय लोकांना माझ्या वक्तव्याच्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. माझ्या विरोधात पळता भुई करू, असे विरोधक बोलत आहेत. तुम्ही कितीही धमक्या दिल्या तरी माझं काम सुरूच राहणार आहे. ते थांबणार नाही. मी शेतकऱ्यांच्या विरोधात गेल्या 40 वर्षात कधीही बोललो नाही. जनता जनार्दन माझी मायबाप आहे. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मी 25 वर्ष निवडून येत आहे. त्याच्यामुळे मी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात बोललो नाही. माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गरीब माणूस किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणार नाही. मला शेतकऱ्यांची माफी मागायला काय, मी हजार वेळा शेतकऱ्यांची माफी मागील. पण, मी बोललेलो नाही. मला शेतकऱ्यांबद्दल आदर आहे. काही लोकांना सहन होत नाही की, हा नेमका निवडून कसा येतो? म्हणून नऊ-दहा लोकांचे टोळके जे राजकीय पक्षांनी पोसलेले आहे, त्यांचा अतिरेक होत आहे. मी गाव पातळीवरील कार्यकर्त्याविषयी बोललो आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

YouTube video player

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बबनराव लोणीकरांचे विधान पूर्णपणे चुकीच आहे. काही लोकांना उद्देशून जरी त्यांनी असे विधान केले असेल तरी असे विधान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान म्हणतात मी प्रधानसेवक आहे. आम्ही सर्व जनतेचे सेवेक आहोत, आम्हाला मालक बनता येणार नाही. बबनराव लोणीकरांच वक्तव्य चुकीच आहे, तशी त्यांना समज देण्यात येईल” असे मुख्यमंत्री म्हणाले.

बबनराव लोणीकर काय म्हणाले?
भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले आहेत, अशी भाषा लोणीकरांनी वापरली आहे. गावातील काही टिकाकरांवर बोलताना लोणीकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “तुमच्या आई, बहीण आणि बायकोला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हीच देतो. तुमच्या अंगावरचे कपडे आणि बुटं देखील आम्हीच दिलेले आहेत” अशी भाषा लोणीकरांनी वापरली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान...