Thursday, January 8, 2026
Homeराजकीयकाल महायुतीला अल्टिमेटम, आज पवारांची भेट; बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर?

काल महायुतीला अल्टिमेटम, आज पवारांची भेट; बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर?

पुणे । Pune

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीपासून (Maha VIkas Aghadi) दूर गेलेले बच्चू कडू (Bachchu Kadu) पुन्हा परतीच्या वाटेवर दिसत आहेत.

- Advertisement -

बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शनिवारी (१० ऑगस्ट) सकाळी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली आहे. या या भेटीनंतर बच्चू कडू यांनी महाविकासआघाडीमध्ये सहभागी होण्याबद्दल मोठे वक्तव्य केले. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

YouTube video player

बच्चू कडू म्हणाले, ही भेट अगोदरच ठरली होती. आम्ही सरकारला काही मुद्द्यांबाबत निवेदन दिलं आहे. त्याच मुद्द्यांवर पवारसाहेबांशी चर्चा करणार आहे. जसे जाती-धर्मावर राजकारण होते. तसे, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग अशा मुद्द्यांवर राजकारण झालं पाहिजे.

हे ही वाचा : अदानीनंतर आता कोणाचा नंबर? Hindenburg Research च्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

विधानसभेला ‘मविआ’सोबत जाणार का? या प्रश्नावर बच्चू कडू यांनी म्हटलं, अजून तसे काही ठरलं नाही. १ सप्टेंबरपर्यंत महायुती सरकारला ‘अल्टिमेटम’ दिला आहे. महायुतीत मी खूश असो किंवा नसो. शेतकरी, मजूरांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांच्या नाराजीचा सूर नेहमी आम्ही सरकारसमोर ठेवत असतो.

दरम्यान, दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शुक्रवारी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केले त्यानंतर त्यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली. सत्तेत असूनही प्रश्न सुटत नसल्याने बच्चू कडू महायुतीला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा : Plane Crash : प्रवासी विमान कोसळलं, ६२ जणांचा मृत्यू… अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

राज्यातील तीन पक्षाच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांचे विविध प्रश्नांवरून एक एकमेकांसोबत जोरदार खटके उडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यातच बच्चू कडू यांनी पवारांमधील भेट राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबावतंत्र वापरून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

टॅरिफ

रशियावर ५०० टक्के टॅरिफ लादणाऱ्या विधेयकाला अमेरिकेत मंजुरी; भारतावरही ‘इतके’ टक्के...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियावर ५०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील विधेयक पुढील आठवड्यात संमत होण्याची...