Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्ह्यात अवकाळीचा तडाखा ; वादळामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान

जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा ; वादळामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान

यावल – प्रतिनिधी jalgaon

सातपुडा पर्वतरांगेच्या (Satpura Mountains) लागूनच असलेल्या वडरी परसाडे मोहराळा सावखेडा चुंचाळे डोंगर कठोरा परिसरात दि.28 ची मध्यरात्री झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांच्या केळीचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे महसूल खात्यातर्फे करण्यात येत असून आता तोंडाशी आलेला घास वादळाने शेतकऱ्यांच्या तोंडातून हिरावून घेतल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहे.

- Advertisement -

दिनांक 28 मे च्या मध्यरात्री अचानक अकरा वाजेपासून वादळ सुरू झाले त्यात मोठ्या प्रमाणावर मोहराळा शेत शिवारामध्ये केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतचे शेत उध्वस्त झालेले आहे बुऱ्हानपूर अंकलेश्वर रस्त्यावरील चितोडा ते सांगवी दरम्यान मुख्य रस्त्यावर रात्री दोन तीन झाडे मुळा सकट उपटून पडलेली होती तसेच डोंगर कठोरा चितोडा शिवारात केळीचे थोड्या अंशी नुकसान झाले आहे तर वडरी परसाडे मोहराळा चिंचाळा सावखेडा परिसरात मात्र त्याचा मोठा फटका बसलेला आहे.

परसाडे गावात एका घराची पत्रे उडून त्यात मोठा दोन लाखाचा घोडा दाबला गेल्यामुळे मयत झाल्याची ही घटना घडलेली आहे. मोहराला शिवारामध्ये तलाठी कोतवाल पोलीस पाटील हे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत असून त्याचा अंदाज तहसील कडून मिळणार आहे.

परसाडे गावात रात्री एक ते तीन वाजेच्या सुमारास झालेल्या चक्रीवादळ मुळे परसाडे तालुका यावल येथील पीरखा लालखा तडवी यांच्या घराचे घोडा बांधत असलेल्या पत्रांचे छत कोसळून घोडा लाकडं खाली व पत्रांखाली दाबला जाऊन मरण पावला आहे. आदिवासी कुटुंबाचे अंदाजे दोन लाखापर्यंतचे नुकसान झालेले आहे. शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा कुटुंबाला आहे, पंचनामा तलाठी समीर तडवी ग्रामसेवक मजीत तडवी अश्वमालक पिरखा तडवी व शव विच्छेदन डॉक्टर भगुरे पशुवैद्यकीय अधिकारी यावल यांच्या उपस्थितीत करून दफन विधी कुटुंबातील सदस्य प्रमाणे केला जाणार आहे उपस्थित हुसेन तडवी माजी सरपंच रमेश सावडे माजी उपसरपंच बाबासाहेब शंकर भालेराव ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ शिराजून तडवी आरिफ तडवी शब्बीर तडवी असंख्य ग्रामस्थ उपस्थित आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या