Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रBadlapur School Case : बदलापुरात आंदोलनाला हिंसक वळण; नागरिकांकडून शाळेची तोडफोड

Badlapur School Case : बदलापुरात आंदोलनाला हिंसक वळण; नागरिकांकडून शाळेची तोडफोड

मुंबई | Mumbai

मुंबईमधील बदलापूर (Badlapur) पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि.२० ऑगस्ट) सकाळपासून हजारो बदलापूरकर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. जनतेकडून तीव्र निदर्शने सुरु असून आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.अशातच आता बदलापूर अत्याचार प्रकरणावरून सुरु झालेले आंदोलन चिघळले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Badlapur School Case : लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आरोपींना…”

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळावर (Railway Track) उतरलेल्या आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा येथे जमला होता. त्यानंतर पोलिसांना बाजूला सारण्यासाठी आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या दगडफेकीत काही महिलांना दुखापत झाली आहे. तसेच काही पोलीसही जखमी झाले आहेत.

हे देखील वाचा : धक्कादायक! अल्पवयीन मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार; संतप्त पालक रस्त्यावर उतरले

दरम्यान, या आंदोलनाला (Agitation) आता हिंसक वळण लागले असून शाळेच्या आत काही आंदोलक शिरले आहेत. तर पोलिसांकडून (Police) शाळेमध्ये अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. बदलापुरात या घटेनमुळे अतिशय उद्रेक झाला आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शाळा परिसरात आता आंदोलकांची धरपकड सुरु झाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...