अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बदलापूर (Badlapur) येथील घटनेच्या निषेधार्थ महविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas Aghadi) नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन (Protest Movement) करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती तोंडावर बांधल्या होत्या. महाविकास आघाडीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंद पुकारला होता. मात्र, न्यायालयाने बंदला परवानगी नाकारल्याने आघाडीतर्फे राज्यभरात निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नगरमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
तोंडाला काळ्या फिती बांधून कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते. यावेळी ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम, कॉगेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राष्टवादी पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, भगवान फुलसोंदर, संजय शेडगे, शरद झोडगे, बाळासाहेब बोराटे, राजू भगत, योगीराज गाडे, सुरेखा कदम, मंगल भुजबळ, नलिनी गायकवाड़, अरुणा गोयल, मनोज गुंदेचा, दत्ता जाधव, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, दत्ता कावरे, संग्राम कोतकर, शाम नळकांडे, सचिन शिंदे, संदीप दातरंगे, मुन्ना भिगारदीवे, जेम्स आल्हाट, परेश लोखंडे, संतोष गेनपा, प्रा. सीताराम काकडे आदी उपस्थित होते.