Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजत्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर अत्याचार

बदलापूर | Badlapur
बदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य घडले. या प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या शाळा प्रशासनाने देखील स्कूल बस चालकाची बाजू घेतल्याने पालकांचा संताप अनावर झाला आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या पश्चिमेला ही भयानक घटना घडली आहे. त्यामुळे प्रचंड संतापाचे वातावरण असून मुलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणाती आरोपी वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार असून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते.

- Advertisement -

नेमकी घटना काय घडली?
बदलापूर पश्चिम भागात नर्सरीमध्ये शिकणाऱ्या एका चार वर्षाच्या चिमुकलीला शाळेतून घेऊन स्कूल व्हॅन चालक घरच्या दिशेने निघाला होता. या बसमध्ये इतर शाळेचे विद्यार्थीही असल्यामुळे बस पोहोचायला नेहमी उशीर लागत होता. मात्र आज दुपारी दीड वाजता येणारी बस वेळेवर न आल्याने पीडित मुलीच्या आईने स्कूल बस चालकाला फोन केल्यावर ही बस तब्बल पाऊण तास उशिराने घराजवळ आली.

YouTube video player

मुलगी रडायला लागल्याने आईने विचारणा केली
स्कूल बसमधून उतरल्यानंतर पीडित मुलगी रडत असल्याने तिच्या आईने तिला विचारणा केली. स्कूल बसमध्ये घडलेल्या प्रकारानंतर चिमुकलीने आपल्या पालकांना घडलेल्या घटनांची माहिती दिली. यानंतर लगेचच पालक शाळेच्या मुख्यध्यापकांना याबाबत जाब विचारण्यासाठी गेले. पीडित मुलीने घडलेला प्रकार मुख्याध्यापिकेच्या समोर सांगितल्यानंतर देखील संबंधित मुख्याध्यापिकेने पालकांना हवा तसा प्रतिसाद दिला नाही.

यावेळी, मुख्याधापिकेने बस ड्रायव्हरला शाळेत बोलावून घेतले. बस चालक शाळेत आल्यानंतर मुख्याधापिकांच्या केबिनमध्ये शिरला तेव्हा तिथे असलेली चार वर्षांची चिमुरडी घाबरली. ती आपल्या पालकांच्या पाठीमागे लपली. यावरुन पालकांना मुलीच्या मनस्थितीचा अंदाज आला आणि त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात राज्य सरकारने निर्देश देऊनही बसमध्ये महिला अटेंडंट नसल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे आता बस चालकासह शाळेवरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मोठी बातमी! महाड राड्याप्रकरणी विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर शरण, अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

स्कूल व्हॅनच्या चालकाने इतर मुलांना सोडण्यासाठी उशीर झाला त्यामुळे येण्यास विलंब झाला असे कारण पुढे केले, मात्र मुलीची अवस्था पाहिल्यानंतर पालकांना देखील काहीतरी चुकीचे घडल्याचे लक्षात आले. ज्या बस मधून ही चिमुकली प्रवास करीत होती, त्या बसमध्ये कोणतीही महिला अटेंडंट नसल्याने हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बस चालकासोबत शाळा प्रशासनावरही कारवाई करण्याची मागणी बदलापूरकर करीत आहेत.

दरम्यान, हा प्रकार समजताच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसेच राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी स्कूल व्हॅनवर दगड फेकून मारला. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. काल मध्यरात्री बदलापूर अत्याचार प्रकरणात तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आली होती. या टीमने स्कूल व्हॅनची तपासणी करुन पुरावे गोळा गेले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणाच्या तपासात पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...