Monday, June 17, 2024
Homeनगरबजरंग दलाच्या भंडारींवर खुनी हल्ला

बजरंग दलाच्या भंडारींवर खुनी हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

बजरंग दलाचे पदाधिकारी कुणाल सुनील भंडारी (वय 29 रा. आनंदनगर, स्टेशन रोड, नगर) यांच्यावर सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास रामवाडी परिसरात खूनी हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. जखमी भंडारी यांच्यावर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे.

आस्थापनांमधील तक्रार समितीचा अहवाल 8 दिवसांत पाठवा

नासीर शेख, अल्तमेश शेख, सादीक शेख मौलाना, सलमान हिनु शेख, सलमान अस्लम शेख, जाकीर तांबोळी, अश्फाक शेख, अफजल शेख, सहेबान जहागीरदार यांच्यासह अन्य 20 ते 25 जणाविरूध्द हा गुन्हा दाखल केला आहे. कुणाल भंडारी व बंटी ढापसे सोमवारी रात्री दुचाकीवरून तारकपूरवरून रामवाडीमार्गे कापडबाजाराकडे जात असताना रामवाडी चौकात 25 ते 30 जणांच्या जमाव त्यांच्या दिशेने आला. त्यांच्या हातात दांडके, लोखंडी रॉड व चॉपर होते.

रस्ता लूट करणार्‍या दरोडेखोरांची टोळी जेरबंद

नसीर म्हणाला,‘येच हे वो चादर चढाणे वाला, ये ले बात कर अफजल भाईसे, सहेबान जहागीरदारने बोलेला है, इसका काम करदो,’ असे म्हणून त्याने सोबत असलेल्या जमावाला भंडारी यांच्यावर हल्ला करण्यास सांगितले. भंडारी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अल्तमश शेख याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने तर नसीर शेख याने चॉपरने हल्ला करून जखमी केले. जखमी भंडारी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

शिर्डी रामनवमी उत्सवात दोन गटाचे दोन अध्यक्ष प्रा. होले यांचे मारेकरी सापडेना!

- Advertisment -

ताज्या बातम्या