Wednesday, June 19, 2024
Homeमुख्य बातम्याBeed Loksabha 2024 : अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव, बजरंग सोनवणे विजयी

Beed Loksabha 2024 : अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव, बजरंग सोनवणे विजयी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा ६ हजार ५८५ मतांनी पराभव केला आहे. दरम्यान केवळ सहा मतदान यंत्र मोजणे बाकी होती. मात्र, त्यामध्येही बजरंग सोनवणेंनी बाजी मारली.

पंकजा मुंडेंकडून बीड आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेर मतमोजणी करण्यात आली. त्या मतमोजणीत बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला.

दरम्यान, मतमोजणीच्या ३२ व्या फेरीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल समोर आला होता. तर ३१ व्या फेरीनंतर पंकजा मुंडे ४०० मतांनी आघाडीवर होत्या. मात्र, त्यांनतर शेवटच्या फेरीपर्यंत बीडमध्ये ट्वीस्ट पाहायला मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या