Friday, November 22, 2024
HomeनगरBalasaheb Thorat on Radhakrishna Vikhe Patil : निळवंडेसाठी त्यांचे कवडीचेही योगदान नाही;...

Balasaheb Thorat on Radhakrishna Vikhe Patil : निळवंडेसाठी त्यांचे कवडीचेही योगदान नाही; आ. थोरात यांचा मंत्री विखे यांच्यावर निशाणा

तळेगाव दिघे । वार्ताहर

अनेक अडचर्णीवर मात करीत आपण निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले. निळवंडेसाठी आदर्श पुनर्वसन केले. त्यासाठी आपण स्वतःची जमीन दिली. शेजारच्यांनी गुंठाही जमीन दिली नाही.

- Advertisement -

निळवंडेचे काम कुणी केले हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, आपल्याला नाव ठेवणाऱ्यांचे निळवंडेसाठी कवडीचेही योगदान नाही, असे टीकास्र माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाव न घेता सोडले. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

निळवंडेचे पाणी खालच्याला द्यायचे तसे वरच्यांनाही द्यायचे ही आपली भूमिका आहे. मध्य प्रदेशातील हरिपुरासारखा पॅटर्न राबविण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. बोलघेवड्यांच्या मागे न लागता काम करणाऱ्याच्या पाठिशी आपण उभे राहिले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग चांगल्यासाठी केला. दोन वर्षापासून आपल्याकडे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सत्ता आणि पैशांचा काहींना गर्व आणि अहंकार झाला आहे. तो उतरविण्याचे काम आपण केले आहे. चांगले काय आणि वाईट काय हे आपण ठरविले पाहिजे. आपल्या तालुक्याची संस्कृती जपण्याचे काम आपण केले पाहिजे. चांगले राजकारण करणाऱ्याच्या पाठिशी आपण खंबीर राहिले पाहिजे. भोजापूर चारीसाठी ज्यांचे काही योगदान नाही, ते येऊन भाषणे करतात. निवडणुकीच्या निमित्ताने बनवाबनवीचा कार्यक्रम चालला आहे, असा निशाणा आमदार थोरात यांनी साधला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या