Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्यामुसळधार पावसामुळे बंधारा फुटला; शेतीचे नुकसान

मुसळधार पावसामुळे बंधारा फुटला; शेतीचे नुकसान

वावी | संतोष भोपी Vavi

सिन्नर तालुक्यातील ( Sinnar Taluka ) कोळगाव माळ ( Kolgaon Mal ) येथील गेल्या40 वर्षा पासूनचा सर्वात जुना बंधारा फुटल्याने संपूर्ण कोळगाव माळ परिसर सरासरी 50 हेक्टर पेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होऊन 50 कुटुंबाच्या घराला पाण्याने वळसा घातला आहे.

- Advertisement -

गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेला रोजगार हमी योजनेतून हाच तो बंधारा ढगफुटी सदृश पावसामुळे एकाच पावसात पाणी ओसंडून वाहू लागlला आज पर्यंत हा बंधारा केव्हाही भरला नव्हता जवळपास 30 ते 35 एकरामध्ये बांधण्यात आलेला या बंधाऱ्याची क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यामुळे पाण्याच्या दाबामुळे बंधाऱ्याला मध्यभागी तडा जाऊन बंधाऱ्याच्या जवळपास असणारे उस ,मका, सोयाबीन ,तसेच द्राक्ष फळबागां या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तसेच प्रकाश रुईकर ,कैलास रुईकर यांच्या कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने यांचे लाखोंचे नुकसान झाले वामन चंद्रे ,वसंत धोक्रट रामनाथ मोरे ,सुदाम गव्हाणे या शेतकऱ्यांच्या घराला पूर्णपणे पाण्याने वेढा घातल्यामुळे त्या कुटुंबियांचे त्यांच्या जनावरांना सहित गावात स्थलांतरित करण्यात आले शिवाय 50 कुटुंबीयांना त्यांच्या मळ्यात जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता करावा लागला सदर शेती पिकावर कोळगाव माळ कामगार तलाठी व लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता यांनी भेट दिली असून पंचनामा सुरू आहे

कोळगाव माळ व परिसरात गेल्या पन्नास वर्षात असा पाऊस केव्हाही झाला नाही या ढगफुटी पावसामुळे 50 हेक्टर शेती पिकांबरोबरच 50 ते 60 शेतकरी कुटुंब पाण्याखाली आले असून पंचनामा करून तातडीची मदत करण्यात यावी अशी मागणी सरपंच मुक्ताबाई चंद्रे यानी केली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या