Saturday, September 28, 2024
Homeक्रीडाBAN vs PAK : बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय; पाकिस्तानला चारली धूळ

BAN vs PAK : बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय; पाकिस्तानला चारली धूळ

नवी दिल्ली | New Delhi

पाकिस्तान आणि बांगलादेश (Pakistan and Bangladesh) यांच्य्यात रावळपिंडी येथे खेळविण्यात आलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत (Test Series) पाहुण्या बांगलादेशने पाकिस्तानला २-० अशा फरकाने पराभूत केले आहे. याशिवाय पाकिस्तानला प्रथमच कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतील आव्हान संपुष्टात आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : केंद्रीय पणन अधिकारी लाच घेतांना ताब्यात

पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी (WON) १८५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बांगलादेशने ६ गडी राखून पूर्ण केले. १८५ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली. झाकीर हसन आणि इस्लाम यांनी पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली. मात्र, पाकिस्तानच्या (Pakistan) मीर हमझाने ही भागीदारी फोडून पाकिस्तान संघाला पहिले यश मिळवून दिले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बाटल्या डाेक्यात फाेडून हल्ला; गुन्हे दाखल

बांगलादेशकडून (Bangladesh) सलामीवीर फलंदाज झाकीर हुसेनने सर्वाधिक ४० धावा केल्या. तर शादमान इस्लाम २४, कर्णधार नजमुल हुसेन शांटोने ३८, शाकिब अल हसनने २१ आणि यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने २२ धावा केल्या. तसेच पाकिस्तानकडून अब्रार अहमद,मीर हमझा, खुररम शहेझाद आणि आघा सलमानने १-१ गडी बाद केला. विशेष म्हणजे बांगलादेशला कसोटी सामन्यात केवळ चौथ्यांदा यश मिळाले आहे.

हे देखील वाचा : ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? सरकारने बोलावली तातडीची बैठक

दरम्यान, यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) २००९ मध्ये २-० तसेच २०१४-१५ मध्ये झिंबाब्वेविरूध्द ३-० आणि झिंबाब्वे आणि आयर्लंड विरूध्द मालिका विजय संपादन केला आहे.तर यजमान पाकिस्तानला कसोटी सामन्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्याच्या मालिकेत १७ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान-बांगलादेश कसोटी मालिकेत लिटन दासला सामनावीर तसेच मेहदी हसन मिराझला मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या