Friday, September 20, 2024
HomeनाशिकNashik Crime News : केंद्रीय पणन अधिकारी लाच घेतांना ताब्यात

Nashik Crime News : केंद्रीय पणन अधिकारी लाच घेतांना ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik 

- Advertisement -

केंद्र सरकारच्या (Central Government) कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयांच्या अखत्यारीतील ‘एगमार्क’ अर्थात एजीमार्कला मंजुरी देणाऱ्या नाशिकच्या (Nashik) पणन कार्यालयातील अधिकारी विशाल तळवलकर याला एक लाख रुपयांची लाच घेतांना सीबीआयच्या-एसबी (CBI and ACB) पथकाने गजाआड केले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बाटल्या डाेक्यात फाेडून हल्ला; गुन्हे दाखल

ही कारवाई साेमवारी (दि. २) नाशिकराेड (Nashik Road) येथील आनंदनगर भागातील कार्यालयात करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील (Dhule District) डेअरी प्राॅडक्ट व्यवसायिकास आवश्यक एगमार्कच्या प्रमाणपत्राची आवश्यकता हाेती. त्यासाठी त्याने नाशिकमधील कार्यालयाकडे अर्ज केला हाेता.

हे देखील वाचा : ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? सरकारने बोलावली तातडीची बैठक

मात्र, संशयित तळवलकर व त्याच्या अखत्यारितील लिपिक आणि इतर स्टाफने एक लाख रुपयांची लाच (Bribe) मागितली. त्यानंतर तक्रारदाराने सीबीआय-एसीबीच्या नाशिक युनिटकडे तक्रार नाेंदविली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक रंजित पांडे व पथकाने सापळा रचून तळवलकर याला रंगेहाथ अटक (Arrested) केली. तपास सुरु आहे. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या