नाशिक | Nashik
ऑगस्ट महिना (August Month) सुट्ट्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक सण उत्सव येत असल्याने बँकांना सुट्ट्या (Banking Holidays) असतात. या महिन्यात नऊ दिवस सुट्ट्या असल्याने ग्राहकांची तारांबळ उडणार आहे.
अनेकदा ग्राहक ऑनलाईन पद्धतीने (Online Banking) बँकिंग व्यवहार करतात. परंतु काही जेष्ठ नागरिक आजही बँकेत जाऊन व्यवहार करतात. परंतु या महिन्यात बँकांना नऊ दिवस सुट्टी असल्याने ग्राहकांना अत्यावश्यक व्यवहार (transactions) करतांना अडचणी येणार आहेत.
दरम्यान बँकांना आजपासून म्हणजेच १४ पासून सुट्ट्या सुरू होत आहेत. १४, १५, १६ सलग तीन दिवस बँका बंद राहतील. तर पुढील काही दिवस सण उत्सवाच्या (Festivals) सुट्ट्या असणार आहेत.
यामध्ये १४ ऑगस्ट रोजी महिन्यातील दुसरा शनिवार, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि रविवार, १६ ऑगस्ट पारशी नवीन वर्ष (पतेती), १९ ऑगस्ट मोहरम, २० ऑगस्ट ओणम, २२ ऑगस्ट रक्षाबंधन आणि रविवार, २८ ऑगस्ट महिन्यातील चौथा शनिवार, २९ ऑगस्ट रविवार, ३० ऑगस्ट जन्माष्टमी अशाप्रकारे ऑगस्ट महिन्यात सुट्ट्या असणार आहेत.