Saturday, May 18, 2024
Homeनाशिकआजपासून पुढचे ६ दिवस बँका बंद !

आजपासून पुढचे ६ दिवस बँका बंद !

नाशिक | Nashik

मार्च एन्ड आणि शेवटच्या आठवड्यात आलेल्या सुट्या, यामुळे खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. आज दि. २७) पासून पुढील ६ दिवस बँका बंद राहणार आहेत.

- Advertisement -

२७ मार्च ते २९ मार्चपर्यंत बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर फक्त ३० मार्च आणि ३ एप्रिल हे दोन दिवसच बँकेतील दैनंदिन कामकाज सुरु राहील. त्यामुळे बँकेत महत्त्वाचे काम असल्यास घाई करावी लागणार आहे. महिन्यातील चौथा शनिवार आणि होळीच्या सणासाठी २७ मार्च ते २९ मार्च या काळात सार्वजनिक आणि खासगी बँका बंद राहतील.

त्यानंतर ३१ मार्चला बँकांना सुट्टी नाही. मात्र, आर्थिक वर्ष संपत असल्याने इयर एडिंगच्या कामांसाठी बँकेचे दैनंदिन कामकाज बंद असेल. त्यामुळे ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी ३० मार्च आणि ३ एप्रिल हे फक्त दोन दिवस उपलब्ध असतील. मात्र, इयर एडिंगच्या वर्क लोडमुळे या दोन दिवसांमध्येही बँकांमध्ये कितपत कामकाज होईल, याबाबत शंका आहे.

बँका कधी बंद आणि कधी सुरु राहणार?

२७ मार्च – महिन्यातील शेवटचा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

२८ मार्च – रविवार असल्याने बँक हॉलिडे असेल.

२९ मार्च – होळीची सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.

३० मार्च – यादिवशी बँका सुरु राहतील, पण बँक व्यवहार बंदच राहतील.

३१ मार्च – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही.

१ एप्रिल – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही.

२ एप्रिल – गुड फ्रायडेची सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहतील.

३ एप्रिल – यादिवशी बँका सुरु राहतील.

४ एप्रिल – बँकांना रविवार आणि ईस्टर डेची सुट्टी असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या