Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBaramati By Election Result 2026 : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा बारामती पोटनिवडणुकीत विजय;...

Baramati By Election Result 2026 : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा बारामती पोटनिवडणुकीत विजय; अजित पवारांचा ‘तो’ रेकॉर्ड मोडला

मुंबई | Mumbai

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी (दि.२३ एप्रिल रोजी) मतदान झाले होते. त्यानंतर आज (दि.०४) रोजी मतमोजणी पार पडली असता या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. बारामतीत सुरुवातीपासून सुनेत्रा पवार विजय मिळवतील असे सांगितले जात होते. अखेर हा अंदाज खरा ठरवत सुनेत्रा पवारांनी विरोधी उमेदवारांना धूळ चारली आहे.

- Advertisement -

सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांनी ऐतिहासिक विजय मिळविला आहे. त्यांचा एवढ्या मतांनी विजय होणे हा देशातील सर्वात मोठा पहिल्या क्रमांकाचा लीड ठरला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीकडून प्रयत्न केले गेले होते. या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षाने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला होता. तर काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला होता. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतला होता. शिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारही प्रचारात उतरले होते. त्यानंतर आता या निवडणुकीत सुनेत्रा पवारांनी एकतर्फी विजय मिळवला आहे.

हे देखील वाचा : Baramati By Election Result 2026 : विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचताच DCM सुनेत्रा पवारांची सोशल मीडियावर काळजाला भिडणारी पोस्ट

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीतील सर्व मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना मिळालेले हे मताधिक्य आतापर्यंत देशातील सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा करण्यात येत आहे. याआधी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा हे २०२२ साली २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजयी झाले होते. त्यानंतर आता सुनेत्रा पवारांनी त्यांचा विक्रम मोडला असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवाराला हजारापेक्षा जास्त मते पडली नसल्याचे दिसून आले. यात करूणा मुंडे यांना १२५ तर बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांना १२१ मते मिळाली आहेत.

अजित पवारांचा ‘तो’ रेकॉर्ड मोडला

अजित पवार यांनी २०१९ मध्ये भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. तर २०२४ मध्ये अजित पवार यांची लढत राष्ट्रवादीतील फुटीमुळे त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी झाली होती. त्यावेळी युगेंद्र हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते. २०२४ च्या निवडणुकीत अजित पवारांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला होता. त्यानंतर आज लागलेल्या पोटनिवडणुकीच्या निकालात सुनेत्रा पवारांनी हा विक्रम मोडून काढला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पखालरोडवरील गुलशन कॉलनीतील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर (Girl Student) वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार...