Friday, August 21, 2026
Homeमुख्य बातम्याBaramati By Election Result 2026 : विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचताच DCM सुनेत्रा पवारांची सोशल...

Baramati By Election Result 2026 : विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचताच DCM सुनेत्रा पवारांची सोशल मीडियावर काळजाला भिडणारी पोस्ट

बारामती | Baramti

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामतीत (Baramti) आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी (दि.२३ एप्रिल रोजी) मतदान पार पडले होते. त्यानंतर आज (दि.०४) रोजी दोन्ही ठिकाणची मतमोजणी पार पडत आहे.

- Advertisement -

बारामती पोटनिवडणुकीच्या (Baramati By Election) निकालाच्या ११ व्या फेरीच्या मतमोजणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या ०१ लाख तीन हजार मतांनी आघाडीवर आहे. सुनेत्रा पवारांची ही आघाडी आणखी वाढत जाणार असून विजयही जवळपास निश्चित झाला आहे. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांसह (Sunetra Pawar) एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. तर राहुरीतून शिवाजीराव कर्डिले यांचे पूत्र अक्षय कर्डिले यांच्यासह ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक घ्यावी लागली.

सुनेत्रा पवारांनी पोस्टमध्ये काय म्हटले?

आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते, असं उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. अजितदादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची असं सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सुनेत्रा पवार अजित पवारांच्या मतांचा विक्रम मोडणार?

अजित पवार यांनी २०१९ मध्ये भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. तर २०२४ मध्ये अजित पवार यांची लढत राष्ट्रवादीतील फुटीमुळे त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी झाली होती. त्यावेळी युगेंद्र हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते.२०२४ च्या निवडणुकीत अजित पवारांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता होत असलेल्या पोटनिवडणुकीत अजित पवार यांच्या मतांचा विक्रम सुनेत्रा पवार मोडतात का? हे बघावे लागणार आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : सत्तेचा सोहळा आणि निष्ठेची उपेक्षा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक राजकारणात तत्त्व, निष्ठा, विचार आणि संघटनात्मक कार्यापेक्षा सत्ता व लाभाच्या पदांना आज किती महत्त्व आले आहे,...