Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBaramati ByPoll Elections: बारामती पोटनिवडणुकीसाठी जोरदार राजकीय हालचाली; सुनेत्रा पवारांचा उध्दव ठाकरेंना...

Baramati ByPoll Elections: बारामती पोटनिवडणुकीसाठी जोरदार राजकीय हालचाली; सुनेत्रा पवारांचा उध्दव ठाकरेंना फोन, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

मुंबई | Mumbai
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या अनुषांगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महायुती बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध करण्याच्या तयारीत असतानाच काँग्रेसने दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे बारामती आणि राहुरीची पोटनिवडणुक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने बारामतीत निवडणुक न लढवण्याच निर्णय घेतला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

सुनेत्रा पवार यांनी उध्दव ठाकरे यांना फोन करुन बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवार विनंती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहे. सुनेत्रा पवार सोमवारी (6 एप्रिलला) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

काँग्रेस पक्ष बारामती पोटनिवडणुकीत उतरल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून शिवसेनेचा पाठिंबा मागितल्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे काँग्रेससोबत याविषयावर चर्चा करतील का याची उत्सुकता ताणली गेली आहे. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी अजून काँग्रेसच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

Nashik Crime News : सातपूरला ‘खरात फाईल्स’ची पुनरावृत्ती! लैंगिक शोषण प्रकरणी रवींद्र एरंडेला बेड्या, पोलिसांच्या हाती लागले पन्नासपेक्षा जास्त ‘न्यूड’ व्हिडिओ

काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती
बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत, निवडणुकीसाठी काँग्रेसने काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्याची माहिती काल समोर आली होती. बारामती पोटनिवडणुकीसाठी 6 इच्छुकांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. तर राहुरी मतदारसंघासाठी 4 उमेदवारांनी पक्षाकडे तिकीट मागितले आहे. या सर्वांच्या ऑनलाईन मुलाखती झाल्यात. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांशी देखील उमेदवारी बाबत चर्चा करत आहे, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस कडून बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठीच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनेत्रा पवार यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना केल्याची माहिती आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते त्यांना विनंती करणार आहेत, आणि आपल्या पक्षाला पाठिंबा द्यावा अशी मागणी करणार आहेत पण काँग्रेस पक्ष या संदर्भात काय भूमिका घेते हेही महत्त्वाचं ठरणार आहे, दरम्यान सुनेत्रा पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही पोट निवडणूक बिनविरोध हवी त्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ताज्या बातम्या

Ashok Kharat : शिर्डीतील जमीन व्यवहारांसंदर्भात साक्षीदारांची समोरासमोर चौकशी

0
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीतील बहुचर्चित जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याची शिर्डी पोलिसांकडून मागील पाच दिवसांपासून विविध कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींचे...