Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद कोणाकडे राहणार? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले,...

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद कोणाकडे राहणार? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, “या दुःखाच्यावेळी…”

बारामती | Baramati
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत त्यांच्या स्मृती स्मारकाच्या उभारणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबीयांची बैठक घेतली. या बैठकीचा मूळ मुद्दा हा अजित पवार यांच्या स्मृतीस्थळ उभारणीबाबतचा असला तरी या बैठकीत पुढील राजकीय निर्णय अन् भूमिकांबाबत देखील चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.

या बैठकीला प्रतिभा पवार, शरद पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार, रणजित पवार तसेच विद्या प्रतिष्ठानचे काही विश्वस्त देखील उपस्थित आहेत. अजित पवारांच्या स्मारक आणि इतर बाबीवर चर्चा झाल्याची माहिती आहे, तर या बैठकीबाबत आणि सुरू असलेल्या राजकीय घडामोडीबाबत रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

- Advertisement -

जिथे त्यांचे उमेदवार आहेत, तिथे लोकांनी सहकार्य करावे
यावेळी रोहित पवार म्हणाले, २८ तारखेला अजितदादांच्या विमान अपघाताची घटना घडली. अजित दादा प्रचारासाठी निघाले त्यावेळी ही घटना घडली. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अजित दादा मोठे नेतृत्व होते, जिथे त्यांचे उमेदवार आहेत, तिथे लोकांनी सहकार्य करावे, २८ तारखेपासून कोणतेही राजकिय चर्चा झाली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

YouTube video player

या गोष्टी या दुःखाच्यावेळी बोलता येत नाहीत
रोहित पवार पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद हे पवार कुटुंबीयांकडेच रहावे अशा आशयाचा प्रश्न विचारला असता. रोहित पवार यांनी, ‘तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्रीपद आणि त्या राष्ट्रवादीचे प्रमुख पद हे सुनेत्रा पवार काकींकडेच रहावे अशी आमची देखील इच्छा आहे. फक्त या गोष्टी या दुःखाच्यावेळी बोलता येत नाहीत इतकंच.’

Pune Land Scam: पार्थ पवारांना अद्याप दिलासा नाहीच; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अजून कोणताही अहवाल…”

पवार साहेबांचा मार्गदर्शन जसं पूर्वी मिळत होतं तसंच आता सुद्धा मिळत आहे
पवार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर आमच्या परिवारामध्ये पवार साहेब हे नेहमीच केंद्रबिंदू ठरलेले आहेत, राजकीय दृष्टिकोनातून पवार साहेब यांचे कार्य मोठं होतं, सामाजिक दृष्टिकोनातून कार्य मोठं होतं आणि परिवाराला जेव्हा केव्हा अडचणी आल्या तेव्हा पवारसाहेब भक्कमपणे बरोबर उभे होते. अजित दादा देखील जेव्हा केव्हा अडचण आली तेव्हा परिवारासोबत उभे राहिलेले आहेत, आज दादा नसताना पवार साहेबांचा मार्गदर्शन जसं पूर्वी मिळत होतं तसंच आता सुद्धा ते मिळत आहे, जय पवार, पार्थ पवार, काकी आम्ही सर्वजण पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिगत परिवारातील कोणते विषय असतील, ट्रस्टचा विषय असेल हे सर्व विषय व्यक्तिगत परिवाराचे आहेत, सामाजिक आहेत आणि त्यात कुठेही राजकारण नाही ते सगळे त्यांच्यासमोर मांडतो. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले.

चांगलं स्मारक अजितदादांच्या नावाचं असावं
आमच्या सर्वांचच मत आहे की, चांगलं स्मारक अजितदादांच्या नावाचं तिथे असावं, त्यादृष्टीन जागा कोणती जिथे लोकांना येता येईल, बघता येईल, दर्शन घेता येईल आणि काकांचं काम हे 35-40 वर्षातील राजकारणाचं होतं, त्याबाबत त्यांचं म्युझियम देखील चांगल्या पद्धतीचं व्हावा अशी लोकांची इच्छा आहे, परिवाराची इच्छा आहे, मग ते बारामती शहरांमध्ये असावं की दुसरीकडे कुठे असावं, याबाबतच्या सर्व चर्चा त्या ठिकाणी झाल्या आहेत, पुढच्या काही दिवसात योग्य असा निर्णय परिवाराकडून आणि त्या संस्था आहेत, ज्या सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, त्या सर्व त्या संस्थेचे प्रमुखांनी, ट्रस्टी आहेत, त्यांच्याकडून पुढच्या काही दिवसांमध्ये घोषणा होईल, असे वाटतेय, असे हे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

जे काही महाराष्ट्रात सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी दुःख वाटतं
शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या, त्या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत, युती होईल किंवा विलीनीकरण होईल, नं होईल, यावर मी भाषा करण्या इतका मोठा नाही. फक्त जे काही राजकीय दृष्टिकोनातून काही आरोप प्रत्यारोप चर्चा, जे काही महाराष्ट्रात सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी दुःख वाटतं आहे, अजित दादांसारखा एवढा मोठा माणूस त्याच्या मनामध्ये काही याच्याबद्दल कोणी चर्चा दुर्दैवाने करत नाही, चर्चा दुसरीकडे कुठेतरी भरकटत चाललेली आहे आणि त्याला एक राजकीय स्वरूप मोठ-मोठ्या नेत्यांनी दिले आहे, हे पाहून परिवारातला एक व्यक्ती म्हणून वाईट वाटत आहे, असंही रोहित पवार पुढे म्हणालेत.

ताज्या बातम्या

Nashik Mayor Election : भाजपला नगरसेवकांवर भरोसा नाय का? महापौर, उपमहापौर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीत (Mahapalika Election) स्पष्ट बहुमत मिळालेले असताना भाजपवर महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना (Corporators) सहलीसाठी घेऊन जाण्याची वेळ आली...