Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनिफाड तालुक्यात गोळेगावचा कर्मवीर बंधारा फुटला

निफाड तालुक्यात गोळेगावचा कर्मवीर बंधारा फुटला

शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान

निफाड | प्रतिनिधी Niphad

- Advertisement -

निफाड तालुक्यातील गोदेगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला असून गोळेगाव येथील कर्मवीर बंधारा फुटल्याने शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. भरवस फाटा, निफाड तालुक्यातील गोंदेगाव, गोळेगाव आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाने गोंदेगाव परिसरातील गोळेगाव-गोंदेगाव आणि गोळेगाव-भरवस फाटा, गोंदेगाव- वळदगाव, गोंदेगाव- वाहेगाव या रस्त्यांवरील संपर्क तुटला असून, नद्यांना पूरपरिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे.

YouTube video player

शेतकरी दादा मुदगुल, बाळासाहेब मुदगुल आणि कारभारी मुदगुल यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी शिरले आहे.पावसाच्या माऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडं कोसळून पडली आहेत, त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. गोंदेगव येथिल ओहळ नाल्यालगतच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसले असून बरेच नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीकाठच्या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : अस्तित्वाच्या संघर्षात छोटे पक्ष घायाळ

0
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळविल्याने अनेक छोट्या पक्षांचे अस्तित्वच पुसले गेले आहे. केवळ छोटेच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसारख्या तुलनेने मोठ्या...