Friday, July 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजपंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर; मुर्तींसह सापडला पुरातन ठेवा…

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर; मुर्तींसह सापडला पुरातन ठेवा…

पंढरपूर | Pandharpur
महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तळ घर सापडल्याचे वृत्त आहे. सध्या पंढरपुरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. त्यातच सात ते आठ फुट खोलीचे तळघर सापडले असून पुरातत्व विभागाच्या उपस्थितीत हे तळघर उघडण्यात आले आहे.

- Advertisement -

या तळघरातून अनेक दगडी, लाकडी मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत. पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तू विशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते. त्यांना भग्नमूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत.

तळघराची पाहणी करताना त्यात चार ते साडेचार फुटाच्या दोन विष्णू अवतारातील विष्णू बालाजीची मूर्ती आणि एक महिशासूर मर्दिनीची मूर्ती ही सापडली आहे. आत्तापर्यंत सहा मूर्ती सापडल्या आहेत. सात फूट खोल असलेल्या या तळघरात ६ फूटाची एक खोली आहे. यामध्ये या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती विलास वाहने यांनी दिली.

या मुर्तींसह मातीच्या बांगड्या ही सापडल्या आहे. हे तळघर आतल्या बाजून बंदिस्त असून त्या पलीकडे काही नसल्याचे वाहने यांनी सांगितले. तरी याचा पुढे तपास केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तर १ मुर्ती चांगल्या स्थितीत आहे. पण या मुर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मुर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसल्या आहेत हे कळणार आहे. या वस्तू पाहिल्या तर साधारण शंभर वर्षांपुर्वीच्या असू शकतात असा अंदाज लावला जात आहे. पुरातत्व विभागाच्या संशोधनात हे समोर येऊ शकणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या